Offline Digital Payments | RBI ने दिली ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजूरी, आता इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय करा पेमेंट

नवी दिल्लीवृत्त संस्था – Offline Digital Payments | ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये डिजिटल व्यवहारांना (Digital Transaction) चालना देण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंट्सबाबत (Offline Digital Payments) रूपरेषा जारी केली. सध्या, ऑफलाइन पेमेंट अंतर्गत 200 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना परवानगी आहे. आता कमाल 10 व्यवहारांपर्यंत ऑफलाइन व्यवहार करण्याची मर्यादा असेल म्हणजेच एकूण 2,000 रुपये.

ऑफलाइन डिजिटल पेमेंट म्हणजे असे व्यवहार, ज्यांना इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कची आवश्यकता नसते. ऑफलाइन पद्धतीने, कार्ड, वॉलेट आणि मोबाइलसह कोणत्याही माध्यमातून समोरासमोर पेमेंट केले जाऊ शकते.

AFA आवश्यक नाही

आरबीआयने म्हटले आहे की, अशा व्यवहारांसाठी अ‍ॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन (AFA) आवश्यक नाही. आरबीआयने सांगितले की, यामध्ये पेमेंट ऑफलाईन होणार असल्याने, थोड्या अंतरानंतर ग्राहकांना SMS किंवा ई-मेलद्वारे अ‍ॅलर्ट मिळतील.

किती असेल ट्रांजक्शन लिमिट

प्रत्येक व्यवहाराची मर्यादा 200 रुपये असेल. त्याची एकूण मर्यादा 2,000 रुपये असेल. आरबीआयने सांगितले की, ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात आले होते. मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे. (Offline Digital Payments)

काय होतील याचे फायदा

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ऑफलाइन पेमेंटमुळे खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. विशेषतः गावे आणि छोट्या शहरांमध्ये ही व्यवस्था तात्काळ लागू झाली आहे. ग्राहकांच्या परवानगीनंतरच ऑफलाइन पेमेंटचा वापर करता येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Web Title :  Offline Digital Payments | rbi allows offline digital payments to penerate rural india

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी