home page top 1

अरे देवा ! ‘ही’ ‘ब्युटी क्वीन’ एवढी सुंदर की लग्नासाठी तिला मुलगाच मिळेना !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका ब्युटी क्वीनने दावा केला आहे की, तिच्या सौंदर्यामुळं तिला मनपसंत साथीदार मिळत नाहीये. उत्तर वेल्सच्या लँदुड्नोच्या जॉय स्टॅर्लेने गेल्या वर्षी देशभरातील ब्युटी कॉन्टेस्टमध्ये अनेक किताब जिंकले आहेत. परंतु या 23 वर्षीय मुलीचं म्हणणं आहे की, तिच्या सौंदर्यामुळे तिला चांगली मुलं भेटत नाहीयेत. तिचं म्हणणं आहे की, ती चुकीच्या लोकांना आकर्षित करते. स्टॅर्लेने आता एका नव्या टीव्ही शोच्या ब्युटी पेजेंटमध्ये भाग घेणं सोडलं आहे. हा टीव्ही शो मुलींना विनामेकअप ब्लाइंट डेटवर जाण्याची सुविधा देतो. तिला असं नातं हवं आहे जे बाहेरील सौंदर्याच्या खूप पुढे असेल.

जॉयने अलीकडेच अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. 2016 मध्ये तिने मिस सुपरनॅचरल वेल्स जिंकला होता. तिला मिस कॉनवे गॅलेक्सीचा ताजही घालण्यात आला. मिस गॅलेक्सी वेल्स ब्युटी कॉन्टेस्टमध्ये मिस पॉप्युलॅरिटीचंही नाव देण्यात आल आहे. तिने चेस्टर्स युनिव्हर्सिटीतून फर्स्ट क्लास ऑनर्सची डिग्री मिळवली आहे.

जॉय म्हणाली, “मी डेटसाठी मेकअप करण्याची परवानगी न दिल्याने थोडी भावूक झाले. कारण मी नेहमी मेकअप करते. भलेही मग फक्त काजळ आणि कंसिलर का असेना.”

जॉय म्हणते, “मेकअप एका सुरक्षेसारखा आहे. ब्युटी क्वीन असल्याने जेवढ परफेक्ट दिसणं शक्य होईल तेवढं परफेक्ट दिसण्याचं मी ट्राय करत असते. परंतु मी मझ्या शोमधून एक शिकले आहे की, तुम्ही प्रत्येक वेळी पिक्चर परफेक्ट नाही दिसू शकत.”

जॉय सांगते, “मी जशी दिसते त्यामुळे एकदम विचित्रच मुलं मला भेटतात. चांगली मुलं मला थोडं घाबरतात. कोणीतरी असं असावं जो दयाळू असेल. कुटुंबाची काळजी घेणारा करिअरवर फोकस असणारा.”

जॉय प्रोफेशनल सिंगर बनण्यासाठी ब्युटी पेजेंट सोडत आहे. तिला प्रॉपर्टी डेव्हलपरही बनायचं आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like