अहो आश्चर्यम …! एका गावातील सर्वच विद्यार्थी नापास

हरियाणा :वृत्तसंस्था

सीबीएसई चा बारावी आणि दहावी चा निकाल जाहीर झाला आहे. निकालाची उत्सुकता प्रत्येकालाच असते .पण हरियाणातील दिघोट या गावावतील दहावीच्या परीक्षेत चक्क सर्वच मुले नापास झाली आहेत. १२वी च्या परीक्षांमध्ये देखील दिघोट येथील या शाळेतील २२ पैकी केवळ नऊच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचे वृत्त समजताच संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळेवर हल्लाबोल करत प्रवेशद्वाराला टाळे ठोकले आणि धरणे आंदोलन केले. ग्रामस्थांनी मुख्याध्यापक, शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यापासून रोखले. ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून शिक्षण अधिकारीही गडबडल्याचे दिसले. अखेर त्यांनी याप्रकरणी जबाबदार असलेल्यांना पदावरून हटवण्याचे आश्वासन दिले. सुमारे ९ तासानंतर ग्रामस्थांनी शाळेचे कुलूप काढले.

या दिघोट गावाची लोकसंख्या बावीस हजार आहे. या गावात एकाच ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे. प्राथमिक शाळेत २९६, माध्यमिकमध्ये २११ आणि उच्च माध्यमिक शाळेत २७३ विद्यार्थी आहेत. प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये शिक्षकांची सर्व पदे भरली आहेत. तर उच्च माध्यमिक शाळेत शिक्षकांची अनेक पदे रिकामी आहेत. दहावीच्या परीक्षेत ५१ आणि बारावीच्या परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दहावीत सर्व ५१ विद्यार्थी

या परकरणाची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी सुमन नैन या घटनास्थळी हजार झाल्या. तेथील पंचायत सदस्यांशी चर्चा केली. त्यांना विश्वास देत शिक्षण विभागाच्या नियमानुसार दहावीतील मुलांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. अखेर सर्व संमतीने ग्रामस्थांनी दुपारी तीनच्या सुमारास प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले.