तेल कंपन्यांचा जेट एअरवेजवर ‘ऑइल स्ट्राईक’

इंधन पुरवाठा रोखल्याने अडचणीत वाढ

दिल्ली : वृत्तसंस्था – जेट एअरवेजचे शुक्लकाष्ट संपतांना दिसत नाही. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजला आणखी एक धक्का बसला आहे. आता तर तेल कंपन्यांनी या एअरवेजचा इंधन पुरवठाच रोखल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जेट एअरवेजचे भविष्य धोक्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांनी जेट एअरवेजचा इंधन पुरवठा काही काळ थांबविला असल्याचे समजले आहे. दिल्ली विमानतळावर जेट एअरवेजकडून तेल कंपन्यांची थकीत रक्कम न दिल्यामुळे एक तासापेक्षा अधिक काळ इंधन पुरवठा थांबविला होता, अशी माहिती मिळाली आहे. संध्याकाळी ५ वाजता तेल कंपन्यांकडून होणार पुरवठा थांबविण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा जेट एअरवेजकडून थकीत भरणा निश्चित झाल्यानंतर सुमारे तासाभराने सव्वा सहाला तेल पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात आला.

जेट एअरवेजवरील संकट काही दूर होतांना दिसत नाही आहे. यापूर्वी पुरवठादार, विमानांचे भाडे आणि वैमानिकांना वेळेवर पैसे देऊ शकत नसल्यामुळे यापैकी काहींनी एअरलाइन बरोबरील करार संपुष्टात आणला होता. त्यात आज झालेला इंधन पुरवठा थांबवण्याच्या प्रकाराने त्यात भर पडली आहे.

 

Loading...
You might also like