स्वयंपाक घरात उरलेल्या तेलावर चालेल तुमची कार, जाणून घ्या सरकारची नवी योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकांसाठी एकापेक्षा एक धडाकेबाज योजना आणणारे मोदी सरकार आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वयंपाकासाठी एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याची नवी पद्धत सरकारने शोधून काढली असून आता या उरलेल्या तेलापासून बायो डिझेल बनवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या जागतिक जैवइंधन दिनाच्या दिवशी यासंदर्भात नवीन अ‍ॅप आणि पोस्टरचे उदघाटन देखील सरकारने केले होते. त्याचा आज १५० व्या गांधीजयंतीच्या दिवशी सरकारने याचा पुनरुच्चार करत वापरलेले कूकिंग ऑइल बायोडिझेलसाठी देण्याचे आवाहनही केले.

नेमकी काय आहे योजना :
एकदा स्वयंपाकासाठी वापरलेले तेल पुन्हा जेवणासाठी वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या गेलेल्या खाद्यतेलाचा परत जेवण बनविण्यासाठी वापर केला गेल्यास उच्च रक्तदाब, एथेरोस्क्लेरोसिस, अल्झायमर आणि यकृताचे विविध आजार होण्याचा धोका असतो. म्हणूनच आता सरकारी तेल विपणन कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम(एचपीसीएल), भारत पेट्रोलियम(बीपीसीएल), इंडियन ऑयल कॉर्पोरेशन(आयओसी) वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलापासून बनविलेले बायो डीझेल खरेदी करतील. त्यानुसार कंपन्यांनी बर्‍याच मोठ्या शहरांमध्ये स्वयंपाकाच्या तेलापासून बनविलेले बायोडीझेल खरेदी करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.

या फोन नंबरवर कॉल करा :
आपले वापरलेले स्वयंपाक तेल सबमिट करण्यासाठी आयओसीने(Indian Oil Corporation) जारी केलेल्या माहितीनुसार, आता कोणीही १८००११२१०० वर कॉल करू शकते आणि वापरलेले स्वयंपाक तेल (एकदा वापरल्यानंतर शिल्लक असलेले तेल) सबमिट करू शकेल.

यासाठी सुरु केले नवीन अ‍ॅप :
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला असून आता वापरलेले स्वयंपाकाचे तेल जमा करण्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे आहे. आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मध्ये ‘आम्ही बायोडिझेल बनवण्यासाठी वापरलेले स्वयंपाक तेल पुरवतो’ असे स्टिकर ठेवतील. यानंतर या कंपन्या लिटरमागे ५१ रुपये निश्चित दराने बायो डीझेल खरेदी करतील. दुसर्‍या वर्षी किंमती वाढून ५२.७ रुपये व तिसर्‍या वर्षी ५४.५ रुपये प्रति लीटर केले जाईल.

Visit : Policenama.com