जर तुमच्याकडे असतील 2 LPG गॅस सिलिंडर तर सावधान ! तेल कंपन्या घेऊ शकतात मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपन्यावर ड्रोन हल्ल्याची घटना घडल्यापासून कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत आहे. यानंतर आता बातमी येत आहे की देशांतर्गत तेल विपणन कंपन्या स्वयंपाकाच्या गॅसचे रेशनिंग करू शकतात. एलपीजी गॅसची कमतरता दूर करण्यासाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अल्प कालावधीत रेशन मॅटेड एलपीजी गॅसचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस रेशनिंगचा अर्थ असा आहे की ज्या ग्राहकांकडे केवळ एक सिलिंडर आहे त्यांनाच प्राधान्य दिले जाईल.

पुरवठा खंडित झाल्यामुळे एलपीजीची कमतरता 
एका तेल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘सध्या एलपीजीची कमतरता नाही, परंतु गेल्या आठवड्यातील हल्ल्यानंतर पुरवठा कमी झाला आहे. सरकारी कंपन्या सध्या ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करीत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. ज्यांना एक सिलिंडर आहे त्यांना दोन सिलिंडर असलेल्यांपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाईल. या अधिकाऱ्याने सांगितले की, एलपीजीचा पर्यायी स्रोत तयार करण्यात आला आहे आणि आठवड्याभरात त्याची पहिली मालवाहतूक होईल.

स्वयंपाक गॅसचा पुरवठा का कमी झाला 
३ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील सरकारी तेल आणि गॅस कंपनीला लागलेल्या आगीत घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाला. यानंतर सप्टेंबरमध्ये सौदी अरामकोवर ड्रोन हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचा आणि स्वयंपाकाचा गॅसचा पुरवठा खंडित झाला होता. गेल्या महिन्यात मंगलोर रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सला एलपीजी पुरवठा बंद राहिला. जवळील भागात मुसळधार पाऊस पडल्यानंतर पुरवठा बंद पडण्याचे कारण भूस्खलन हेदिखील होते.

सरकारने दिले आश्वासन 
एका अहवालानुसार, तेल मंत्रालयाने हे सुनिश्चित केले आहे की सणाच्या हंगामात एलपीजी पुरवठ्यांची कमतरता भासू नये. अ‍ॅडनॉक कडून स्वयंपाकाच्या गॅसची नवीन खेप वेळेवर येईल. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब आणि गोव्यात पुरवठा कमी झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, एलपीजीची मागणी पूर्ण करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुरवठ्यात फारसा अडथळा येणार नाही.