Oil Massage | केसांना तेलाची मालिश करण्याचा योग्य मार्ग अन् वेळ काय असावी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Oil Massage | आयुर्वेदात केवळ औषधी वनस्पतींच्या गुणधर्मांबद्दलच नव्हे तर अन्न आणि जीवनशैलीबद्दल देखील बरेच काही लिहिले गेले आहे. आज आपण केसांना तेल लावण्याचे (Oil Massage) फायदे आणि आयुर्वेदानुसार योग्य वेळ याबाबत जाणून घेऊ..

केसांना तेल लावण्याचे फायदे
‘चम्पी’ किंवा मालिश करण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या चालू आहे आणि आपल्यातील पुष्कळजण केस धुण्यापूर्वी डोक्याची मालिश करतात. असा विश्वास आहे की केसांना तेल लावल्याने, केसांना अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो, यामुळे केसांची मुळ मजबूत होते आणि प्रेशर पॉइंट्सवर मालिश केल्यास ताण कमी होतो.

आयुर्वेदानुसार तेल लावण्याशी संबंधित विशेष गोष्टी-
1)
आयुर्वेदानुसार डोकेदुखी वाताशी संबंधित आहे. म्हणून संध्याकाळी ६ वाजता केसांना तेल लावावे. दिवसाची ही वेळ वात कमी करण्यासाठी चांगली आहे.

2) केस धुण्यापूर्वी आपण आठवड्यातून एक किंवा दोनदा तेल देखील लावू शकता. तथापि, केस धुतल्यानंतर तेलाचा वापर टाळला पाहिजे, कारण यामुळे केसांमध्ये धूळ आणि घाणीची समस्या उद्भवू शकते.

3) केसांना नियमित तेल लावल्याने टाळूतील कोंडा आणि खाज सुटण्याची समस्या दूर होते.
तेलात कडुनिंबाची पाने घाला आणि गरम करा आणि आंघोळ करण्यापूर्वी टाळूवर चांगले लावा.
त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. डोक्यातील कोंड्याची समस्या पूर्णपणे कमी होईल.

4) रात्री झोपायच्या आधी आपल्या केसात आणि टाळूमध्ये तेल लावावे.
दुसर्‍या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस धुवावेत.

5) रात्री झोपेच्या अर्धा तास आधी केसांना तेल लावून हलक्या हाताने मालिश केल्यास चांगली झोप येते.

Web Title :- Oil Massage | what is the right way of oil massage according to ayurveda

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल