Oils To Keep Away Mosquitoes | डासांना हुसकावून लावण्यासाठी हे तीन तेले खुप प्रभावी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Oils To Keep Away Mosquitoes | डास चावल्याने तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस सारखे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. दरवर्षी डेंग्यूमुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करणं खूप गरजेचं आहे. डास (Mosquitoes) घाण आणि दूषित पाण्यात वेगाने वाढतात त्यामुळे घरात, बाल्कनीत किंवा बागेत कुठेही पाणी साचू देऊ नका. त्यांची वेळोवेळी साफसफाई करत राहा. त्याच वेळी, काही तेले देखील आहेत जी आपण डासांना पळवून लावण्यासाठी वापरू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ (Oils To Keep Away Mosquitoes)..

 

१) दालचिनी तेल (Cinnamon Oil) :
दालचिनी अन्नाची चव वाढवण्याचं काम करत असली तरी डासांना दूर ठेवण्यासाठीही हा मसाल्याचा प्रकार खुप प्रभावी ठरतो. त्वचेवर दालचिनीचे तेल लावण्याबरोबरच कपड्यांवरही शिंपडा (Oils To Keep Away Mosquitoes).

 

२) कडुलिंबाचे तेल (Neem Oil) :
डासांपासून मुक्त होण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो.

पहिला मार्ग (First Way) :
कडुलिंबाच्या तेलात कापूरचे तुकडे मिसळून स्प्रेच्या बाटलीत भरून घ्या. पानांवर फवारावे व नंतर पान जाळावे. घरात असलेले डास पळून जाऊ लागतील.

 

दुसरा मार्ग (Second Way) :
घराच्या खिडक्या आणि दारांवर कडुलिंबाचं तेल लावायचं आहे. याशिवाय कडुलिंबाच्या तेलाचा दिवाही जाळू शकता, तो प्रभावीही आहे.

 

तिसरा मार्ग (Third Way) :
कडुलिंब आणि खोबरेल तेल समान प्रमाणात घालून ते शरीराच्या मोकळ्या भागावर किंवा संपूर्ण शरीरावर लावा. कडुलिंबात अँटी-प्रोटोझोल संयुगे (Anti-Protozoal Compounds) असतात त्यांना वेगळ्याच प्रकारचा वास येतो. त्या वासाने डास पळून जातात.

 

३) लैव्हेंडर (Lavender Oil) :
लैव्हेंडर तेल आणि त्याची वाळलेली फुले या दोन्हीपासून डास दूर पळतात. याचे कारण त्याचा वास उग्र आहे. त्यामुळे तुमच्या घरात जास्त प्रमाणात डास असतील तर या तेलाचा खुप उपयोग होईल. तेल शरीरावर लावल्याने त्वचाही मुलायम राहते. याशिवाय लॅव्हेंडर रूम फ्रेशनरचा पर्यायही तुमच्याकडे आहे. घरात सर्वाधिक डास असतील तेव्हा त्याची फवारणी करावी.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Oils To Keep Away Mosquitoes | these 3 oils are very effective to keep away mosquitoes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Latest Study | मृत व्यक्तीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते? अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगाने जगाला आश्चर्याचा धक्काच बसला

 

Blood Sugar Control Tips | ब्लड शुगर वाढल्यास अवश्य प्या हे पाणी, रूग्णांना होईल फायदा; जाणून घ्या

 

Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4 आयुर्वेदिक वनस्पती; सूज-श्वासाच्या कमतरतेपासून मिळतो आराम