तेलकट त्वचा असेल तर पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी ! जाणून घ्या 5 सोपे घरगुती उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – जर तुमची स्किन ऑईली असेल तर पावसाळ्यात तुम्हाला अनेक समस्या येतात. अशात काही सोपे घरगुती उपाय करूनही तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.

1) बेसन आणि लिंबू – यासाठी दोन चमचे किंवा गरजेनुसार बेसन घेऊन त्यात प्रमाणानुसार लिंबाचा रस एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनी चेहरा धुवून काढा. यामुळं चेहऱ्याचा तेलकटपणा आणि चिकटपणा दूर होतो.

2) कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा – हा उपायदेखील चांगला आहे. यामुळं पोर्समध्ये जमा झालेली घाण आणि ऑईल दूर होते. त्वचेमधील ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यानं पिंपल्सपासूनही सुटका मिळते.

3) काकडी – काकडी स्लाईसमध्ये कापून घ्या. दुपारी आणि रात्री चेहरा धुतल्यानंतर या स्लाईस चेहऱ्यावर ठेवा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छा धुवून घ्या. यामुळं चेहऱ्याचा तेलकटपणा दूर होतो. यामुळं चेहऱ्याला थंडावा मिळतो. त्वचेला खाज येत असेल तर ही समस्याही दूर होते.

4) मुलतानी माती आणि गुलाब पाणी – 1 चमचा मुलमानी माती आणि 2 चमचे गुलाब पाणी एकत्र करा. तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर हलक्या गरम पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळं चेहऱ्यावरील घाण तर दूर होतेच सोबतच पिंपल, अ‍ॅक्ने, काळे डाग, ड्रायनेस अशी समस्याही दूर होतात.

5) मध आणि साखर – मध आणि साखर एकत्र करा. आता तयार पेस्ट म्हणजे तुमचा स्क्रब आहे. स्क्रबिंगमुळं चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांचा अ‍ॅलर्जीही असते.