Oily Spicy Food | चटपटीत आणि मसालेदार जेवणाची आवड असेल तर, जाणून घ्या जास्त तेल, मसाला खाण्याचे 10 दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Oily Spicy Food | चटपटीत आणि मसालेदार खाण्यात तेल, मसाल्याची मात्रा सर्वात जास्त असते जे शरीरात फॅटी अ‍ॅसिड्स वाढवतात. सोबतच लठ्ठपणा, हृदयाचे आजार, पोटाचे आजार आणि लिव्हरच्या आजाराचा धोकाही वाढवते. अशाप्रकारे जास्त तेल मसाले खाण्याचे (Side effects of eating oily and spicy food) इतरही अनेक दुष्परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

1. गॅसची समस्या
अशा पदार्थांमुळे शरीराचा पीएच बॅलन्स खराब होतो. पीएच लेव्हल अ‍ॅसिडिक सुद्धा असते आणि बेसिक सुद्धा. अशा खाण्याने पित्त वाढते, अ‍ॅसिड वाढते. शरीरात अ‍ॅसिडिक समस्या वाढतात. छातीत जळजळ, गॅस आणि पोट फुगणे असे त्रास होतात.

2. पोट खराब होते
मसालेदार जेवण केल्याने पोट खराब होणे आणि अतिसारची समस्या होते. मिरची मसाल्यातील कॅप्साईसिन पोटाच्या थराचे नुकसान करते, यामुळे जळजळ होते. मळमळ, उलटी, पोटदुखी, तिखट ढेकर येतात.

3. अल्सर होऊ शकतो
मसाल्यातील कॅप्साइसिन पोटातील अ‍ॅसिडचे प्रॉडक्शन वाढवते. गॅस्ट्रिक अल्सर आणि पेप्टिक अल्सरचा आजार होऊ शकतो. आतड्याचा कोलायटीस आजार होऊ शकतो.

4. लिव्हरची समस्या
जास्त तेलकट तिखट खाल्ल्याने शरीरात लिव्हरची समस्या वाढते. मसालेदार पदार्थाचे तेल लिव्हरला जाऊन चिकटते आणि फॅट तयार होऊ लागते. लिव्हर डॅमेज होऊ लागते. यामुळे सिरोसिसची समस्या होऊ शकते. हेपेटायटिस आणि काविळसुद्धा होऊ शकते.

5. लठ्ठपणा
लठ्ठपणाची दोन प्रमुख कारणे असतात, पहिले म्हणजे शरीरात ट्रान्स फॅट म्हणजे अनहेल्दी फॅट जास्त जमा होणे आणि दुसरे मेटाबोलिज्म संथ होणे. जास्त तेलकट, तिखट खाल्ल्याने हे दोन्ही दुष्परिणाम होतात.

6. गुड बॅक्टेरियाचे नुकसान
जास्त तेलकट, तिखट खाल्ल्याने पोटातील गुड बॅक्टेरियाचे नुकसान होते. हे आतड्यातील मायक्रोबायोम खराब करते. जेवण पचवणे आणि हेल्दी मेटाबोलिज्मसाठी हे आवश्यक आहे.

7. त्वचासाठी नुकसानकारक
तेलकट, तिखट जेवणाने त्वचा ऑयली होते. हार्मोनल असंतुलन होऊ शकते. अ‍ॅक्ने आणि पिंपल्सची समस्या वाढते. पोटात सूज येऊ शकते. त्वचेचे रिसेप्टर्स उत्तेजित झाल्याने उष्णता वाढते, अ‍ॅक्नेचा त्रास वाढतो.

8. झोप खराब होते
रात्री तेलकट आणि तिखट जेवण केल्याने झोप खराब होते. गॅस, अपचन, सुस्ती या समस्या होतात.

9. हृदयाला धोका
तेलकट, तिखट खाल्ल्याने ट्रान्स फॅट वाढते जे कोलेस्ट्रॉल वाढवते.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने ब्लड प्रेशर प्रभावित होते म्हणजे ब्लड पास होण्यात अडचण येते.
यामुळे हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. वजन वाढते, डायबिटीज असंतुलित होतो.
हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

10. गरोदर आणि स्तनपान करणार्‍या महिलांसाठी नुकसानकारक
अशा महिलांसाठी तेलकट, तिखट जेवण नुकसानकारक आहे.
गॅसची समस्या वाढते आणि मिल्क प्रॉडक्शन प्रभावित होते.

Web Title :- Oily Spicy Food | side effects of eating oily and spicy food

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane Crime Branch Police | जन आशीर्वाद यात्रेत खिसे कापणारी मालेगावची टोळी अटकेत; लाखोंचा ऐवज हस्तगत

BHR Scam | बीएचआरमध्ये ‘टेंडर’ भरणार्‍या अनेक व्यक्ती मुख्य आरोपीच्या ओळखीच्या; सुनील झंवरच्या कोठडीत वाढ

Pune Crime Branch Police | सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व काडतुस जप्त, गुन्हे शाखेची कारवाई