‘ओजस’ शाळेचे नामकरण होणार भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाबळेवाडीतील (ता. शिरूर, जि. पुणे) आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषदेच्या ओजस शाळेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण केले जाणार आहे. राज्यातील १३ शाळांना आंतरराष्ट्रीय ओजस शाळेची निवड करण्यात आली आहे. त्यातील वाबळेवाडी येथील पहिली शाळा म्हणून जाहीर करण्यात आली होती. या शाळांना शासनाने वाजपेयी यांचे नाव दिले आहे. १३ शाळांना दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे .या शाळेचा नामकरण समारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होत आहे.

वाबळेवाडी येथील ही शाळा २०१२ मध्ये महाराष्ट्रातील पहिली टॅबलेट स्कूल म्हणून जाहीर झाली. तसेच, आयएसओ मानांकन मिळवणारी ती पहिली शाळा आहे. वीजबचतीसाठी या शाळेत चार किलो वॅटचे सोलर युनिट बसवून विजेच्या बाबतीत ती स्वयंपूर्ण आहे. इंटिग्रेटेड करिक्युलम विषय, मित्र योजना, विषयाचे वर्ग, प्रयोग शाळा, डिजिटल शिक्षण व्यवस्था, सहाध्यायी अध्ययन योजना, संगीतोपचार, आर्ट अँड क्राफ्ट, बोटॅनिकल गार्डन, प्राणी व घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे उपक्रम या शाळेने राबवले आहेत.

शाळेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे झिरो एनर्जी स्कूल बिल्डींग, उघडणाºया भिंती, डबल लेअर्ड रूफ, टफन ग्लासच्या भिंती ही सुविधा निर्माण केली आहे या शाळेमध्ये द लर्निंग सेंटर, सायन स्कूल फाउंडेशन, रोबोटिक्स चॅम्पियनशिप, थ्रीडी प्रिंटींग ट्रेडिंग, वर्चुअल लर्निंग अमेरिका, विषय मित्र योजना, स्पोकन इंग्लिश, संस्कृत शिक्षण, प्री प्रायमरी अभ्यासक्रम ,डी एस ओ अंतर्गत क्रिडा प्रशिक्षण हे महत्त्वाचे उपक्रम राबवले जातात.

अडीच हजार मुले प्रवेशासाठी वेटिंगवर

सन २०१३- १४ मध्ये या शाळेची पटसंख्या ३२ होती, ती आता ५५० इतकी झाली आहे. या शाळेत प्रवेशासाठी इच्छुक असणाºया पाल्यांची वेटिंग लिस्ट अडीच हजारावर पोहोचली आहे. इंग्रजी माध्यमांचा खासगी शाळांमधून अनेक मुले या शाळेत शिकण्यासाठी आली आहेत. विशेष म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये एक वर्ष वयाच्या मुलांची अगोदरच नोंदणी झाली आहे.