धक्कादायक……’ओला’ चालकाचे पॉर्न पाहून महिलेसमोर हस्तमैथून

बंगळूरूः वृत्तसंस्था
अोला चालकाने मोबाईलवर पाॅर्न व्हिडिअो पाहून महिला प्रवाशासमोरच हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना येथील जेपी नगरमध्ये समोर आली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून, महिला प्रवाशाने दिलेल्या फिर्यादीवरून अोला चालकाच्या विरुद्ध कुबाॅन पार्क पोलीस चाैकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’113a084c-a9e9-11e8-8294-ff1582fbaf42′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला एका खासगी कंपनीत नोकरी करते. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठ अोला कंपनीच्या मोटारीमध्ये बसली होती. यावेळी चालकाने त्याच्या शेजारील आरसा प्रवासी महिलेच्या दिशेने फिरवला. आरशामध्ये महिलेला तो पहात होता. त्याच वेळी त्याने मोबाईलवर पाॅर्न व्हिडिअो सुरु करुन हस्तमैथून करण्यास सुरूवात केली. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने तात्काळ त्याला मोटार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर देखील नकार देत त्याने घटनास्थळ सोडले. अोला कंपनीला देखील या प्रकाराची कल्पना दिल्यानंतर संबंधित चालक आमच्या कंपनीत नुकताच सहभागी झाला होता. आम्ही महिला प्रवाशाच्या बाजूने ठामपणे उभे राहून पोलिसांना सहकार्य करणार आहोत, अशी माहिती अोला कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे.

ड्रीम बॉय निकला बदसूरत अधेड़ उम्र का शख्स