OLA Electric Car | Independence Day ला OLA चा डबल धमाका, इलेक्ट्रिक कारची घोषणा, 4 सेकंदात पकडणार 100 चा वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – OLA Electric Car | ओला इलेक्ट्रिकने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक जगाला दाखवली आहे. यासोबतच कंपनीने नवीन स्कूटर Ola S-1 लाँच केली आहे. कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी सांगितले की, Ola S1 ची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये असेल. ओलाचे हे दुसरे इलेक्ट्रिक प्रॉडक्ट आहे. (OLA Electric Car)

 

भावेश अग्रवाल यांनी ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली आहे. त्यांनी सांगितले की ओलाची पहिली कार 2024 मध्ये येईल आणि ती उत्तम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. ओलाच्या इलेक्ट्रिक कारची रेंज 500 किमी असेल. दाखवलेल्या व्हिडिओनुसार, ओलाची पहिली कार सेडान सेगमेंटमध्ये असू शकते.

 

ऑल ग्लास रूफ

ओला इलेक्ट्रिक कारमध्ये ऑल ग्लास रूफ असेल. यामुळे कारच्या एरो-डायनॅमिक्समध्ये सुधारणा होईल. ओलाने नुकतीच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली आहे. भावेश अग्रवाल म्हणाले की, ओलाची कार केवळ की लेस नव्हे, तर ड्रायव्हर लेस सुद्धा असेल. यात असिस्टेड ड्रायव्हिंग फीचर्स देखील मिळतील. आमची कार सर्वात वेगवान असेल, असा दावा त्यांनी केला. (OLA Electric Car)

भावेश म्हणाले की, ही भारतात बनवलेली सर्वात स्पोर्टी कार असेल. दोन व्हेईकल प्लॅटफॉर्म आणि सहा वेगवेगळ्या कार विकसित करण्याची त्यांची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व तामिळनाडू येथील कारखान्यात तयार केले जाईल.

 

Ola S-1 स्कूटरसाठी बुकिंग

याशिवाय कंपनीने Ola S-1 बाजारात आणले आहे.
भावेशने सांगितले की, नवीन Ola S-1 स्कूटरचे बुकिंग आजपासून सुरू होत आहे.
केवळ 499 रुपये भरून विशेष प्रास्ताविक किंमतीवर ती बुक करता येईल.
नवीन ई-स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ती पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Ola S-1 ही S-1 Pro च्या मिळती-जुळती आहे आणि या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

Ola S1 Pro झीे कंपनीने गेल्या वर्षी लाँच केला होता. Ola S1 मध्ये 3 kWh बॅटरी आहे.
कंपनीचा दावा आहे की नवीन स्कूटरची रेंज 131 किमी आणि टॉप स्पीड 95 किमी/तास आहे.
नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाल, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, निओ मिंट आणि लिक्विड सिल्व्हर या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली जाईल.

 

Web Title : –  OLA Electric Car | ola first electric car revealed today know about photos price features and range

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा