OLA Electric Scooter New Price | ओलाच्या ‘ई-स्कुटर’च्या किमतीत कपात; ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावणार

पोलीसनामा ऑनलाइन – OLA Electric Scooter New Price | देशात ईलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. ईलेक्ट्रीक वाहन खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. त्यातच वाढत्या इंधन दरवाढीमुळे तर नागरिकांनी ईलेक्ट्रीक वाहनांना (OLA Electric Scooter New Price) पसंती देण्यास सुरुवात केल्याचे अलीकडच्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओलाने स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून ईलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरिअंट लाँच केले. याची किंमत लाखाच्यावर होती. मात्र आता महाराष्ट्रातील आणि केंद्राची सबसिडी सुरू झाली आहे. त्यामुळे ओलाच्या स्कूटरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

ओलाने एस १ आणि एस१ प्रो या व्हेरिअंटच्या दोन स्कूटर लाँच केल्या होत्या. एस १ ची किंमत ९९,९९९ रूपये आणि एस१ प्रो ची किंमत १,२९,९९९ रूपये एवढी ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाल्यानंतर ग्राहकांचे या दोन्ही स्कुटरमागे २५ हजार रुपये वाचणार आहे. सबसिडीनंतर ही किंमत अनुक्रमे ७५०९९ आणि १००१४९ एवढी झाली आहे. या किमतीवरून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ईव्ही पॉलिसी सर्वाधिक चांगली आहे.

ओला आजपण तोंडघशी पडली

खरेदी, कर्ज प्रक्रिया करण्यासाठी कंपनीने ८ सप्टेंबरची तारीख दिली होती. मात्र, तांत्रिक अडचण पुढे करून ओलाने पुन्हा १५ सप्टेंबर सकाळी ८ वाजल्यापासूनची वेळ दिली होती. ज्यांनी ४९९ रुपयांमध्ये  बुकिंग केले आहेत त्यांना आज सकाळी मेसेज पाठवले. त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लीक केल्यानंतरही ओला अजूनही चार्जच करतेय असा मेसेज आला. तर दुसरीकडे काहींना लिंकवर गेल्यावर ओलाची स्कूटर रंगापर्यंत सिलेक्ट करता आली. नंतर सर्वच बंद पडले म्हणजे ओलाची वेबसाईट ठप्प झाली आहे.

कशी खरेदी कराल?

स्कूटर खरेदीसाठी ओलाने कर्जाची सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यासाठी ओला फायनान्स सर्व्हिस सुरु केली आहे. कंपनीने आयडीएफसी, एचडीएफसी, टाटा कॅपिटलसोबत हातमिळवणी केली असून एस १ व्हेरियंटचा ईएमआय २९९९ तर एस १ प्रो व्हेरियंटचा ईएमआय ३१९९ रुपयांचा ठेवण्यात आला आहे. दरम्यान ग्राहकांना एचडीएफसी बँक काही मिनिटांत प्री अ‍ॅप्रूव्हड लोन देत आहे. यासाठी ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अ‍ॅप वापरावे लागणार आहे. तर केवायसी प्रक्रियेतून टाटा कॅपिटल आणि आयडीएफ बँक लोन देणार आहे.

Pune Crime | कुख्यात गुंड पप्पू वाडेकर हत्या प्रकरणातील 7 आरोपींवर ‘मोक्का’

कर्जावर स्कुटर खरेदी करायची नसेल तर एस १ साठी २० हजार तर एस १ प्रोसाठी २५ हजार रुपये भरून बुक करू शकतो. त्यानंतर स्कूटर डिलिव्हर होताना उर्वरित रक्कम द्यावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे डाऊन पेमेंट आणि अ‍ॅडव्हान्स हे रिफंडेबल असणार आहे. स्कूटर जोवर ओला फॅक्टरीतून शिप होत नाही, तोवर बुकिंग रद्द करता येणार आहे.

इन्शुरन्स कोण देणार…

ओलाने इन्शुरन्सही उपलब्ध करून दिला आहे. इन्शुरन्स काढण्यासाठी ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अ‍ॅपचा वापर करू शकतो. सध्या ICICI Lombard चा इन्शुरन्स कंपनीने देऊ केला आहे. या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये १ वर्षाचा ओन डॅमेज आणि ५ वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुर्स दिला जाणार आहे. याची किंमत वेगळी असू शकते. तसेच यामध्ये तुम्ही Personal Accident Cover, Zero Depreciation आणि Roadside Assistance अ‍ॅड ऑन घेऊ शकता.

EPFO | पीएफ खातेधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा, आता एक तासात काढा पैसे, जाणून घ्या नियम

टेस्ट राईड न घेताच कशी घ्यायची?

कोणतेही वाहन खरेदीसाठी गेलो की आपण पहिल्यांदा टेस्ट ड्राइव्ह घेतो.
राईड हँडलिंग, तुम्हाला कम्फर्टेबल आहे का, फिचर्स काय आहेत हे पाहिल्याशिवाय घेऊ नका.
नाही तर मोठ्या मोठ्या कंपन्या देखील फसवितात.
त्यामुळे ओला ऑक्टोबर पासून टेस्ट राईड आयोजित करणार आहे.
त्यामुळे टेस्ट राईड घेतल्यानंतरच वाहन खरेदी करा.
टेस्ट राईड घेतली की त्यानंतर फॅक्टरीतून शिप होईपर्यंत तुमच्याकडे बुकिंग रद्द करण्याचा पर्याय आहे.

दरम्यान, ऑक्टोबरपासून एस १ ची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे.
ही स्कूटर थेट घरीच मिळणार असून त्यावेळी उरलेली रक्कम भरावी लागणार आहे.
जर तुम्ही पैसे देण्यास विलंब केला तर तुम्हाला मिळणारी स्कूटर दुसऱ्या ग्राहकाला दिली जाणार आहे.
यानंतर तुम्हाला विलंबाने दुसरी स्कूटर दिली जाईल.

सरकारी सबसिडी मिळविण्यासाठी…

ई लेक्ट्रिक स्कूटरवर सबसिडी मिळविण्यासाठी तुम्हाला आधार, पॅन, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी आपण जर ईव्हीसाठी सबसिडी घेतली असेल तर दुसऱ्यांदा याचा लाभ घेता येणार नाही. तुमच्याकडे आधीची ईव्ही असेल तर त्याचे ईन्व्हॉईस सादर करावे लागणार आहे.

हे देखील वाचा

 

Pune NCP | राष्ट्रवादीकडून बाणेर-बालेवाडी प्रभाग क्र.9 च्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  OLA Electric Scooter New Price | ola electric scooter price slashed 25000 maharashtra after ev subsidy live now

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update