मोफत मिळतेय Ola Scooter, करावे लागेल ‘हे’ काम, Bhavish Aggarwal यांचे ट्विट!

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Ola Scooter | तुम्हालाही ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) मोफत हवी आहे का? मग ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांची ही ऑफर तुम्हाला उपयोगी पडू शकते. ते 10 ग्राहकांना अकाशी रंगाची ओला स्कूटर पूर्णपणे मोफत देणार आहेत. यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेवूयात. (Ola Scooter)

भाविश यांनी ट्विट करून दिली माहिती

भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की त्यांची कंपनी 10 ग्राहकांना मोफत ओला स्कूटर देईल जी एका चार्जमध्ये 200 किमीची रेंज पूर्ण करेल. कंपनीला असे दोन रायडर्स मिळाले आहेत. यापैकी एका रायडरने MoveOS2 आणि एकाने 1.0.16 वर हा पराक्रम केला आहे, म्हणजेच कोणताही रायडर हा पराक्रम करू शकतो.

File photo


जूनमध्ये फ्युचरफॅक्टरीत मिळेल डिलिव्हरी

भाविश अग्रवाल म्हणाले की, जो कोणी विजेता होईल, त्यांना जूनमध्ये कंपनीची ओला फ्युचरफॅक्टरीत बोलावले जाईल आणि तेथे ओला स्कूटरची (Ola Scooter) मोफत डिलिव्हरी केली जाईल.

भाविश अग्रवाल यांचे ट्विट

गेल्या काही काळापासून अनेक ग्राहकांनी ओला स्कूटरबाबत सोशल मीडियावर त्यांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये कंपनीच्या स्कूटरच्या रेंज आणि रिव्हर्स फीचरबाबत सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन कंपनीने नुकतीच आपल्या स्कूटरसाठी MoveOS2 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली आहे.

याशिवाय पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याच्या घटनेमुळेसुद्धा कंपनीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या घटनेनंतर कंपनीला 1,411 ओला स्कूटरही परत मागवाव्या लागल्या.

उघडली नवीन परचेस विंडो

21 मे पासून ओला स्कूटरच्या खरेदीची विंडो पुन्हा सुरू होत आहे. ओला स्कूटरची परचेस विंडो शेवटच्या वेळी 17 आणि 18 मार्च रोजी उघडण्यात आली होती. यावेळी कंपनीने ओला स्कूटरच्या किमतीत 10,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

Web Title : Ola Scooter | bhavish aggarwal tweet about free ola scooter new purchase window open on 21 may

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर