Ola Scooter खरेदी करू शकता रात्री 12 वाजेपर्यंतच, पहिल्या दिवशीच प्रत्येक सेकंदाला विकल्या गेल्या 4 स्कूटर !

नवी दिल्ली : Ola Electric ने आपल्या Ola Scooter चा सेल सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशीच प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर (Ola Scooter) विकून विक्रम केला आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी माहिती दिली की, हिची विक्री आज रात्रीपर्यंत खुली आहे.

पहिल्या दिवशी विकल्या 600 कोटींच्या स्कूटर

Ola चे फाउंडर आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी गुरुवारी ट्विट करून सांगितले की, 15 सप्टेंबरला सुरू झालेल्या Ola Scooter च्या विक्रीत कंपनीने पहिल्या दिवशी 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्कूटर विकल्या आहेत. ओला इलेक्ट्रिकने विक्री सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर विकून विक्रम केला आहे.

आज विक्रीचा शेवटचा दिवस

भाविश अग्रवाल यांनी म्हटले की, ओला स्कूटरची विक्री गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत खुली राहील. त्यांनी ग्राहकांना लवकरात लवकर या इंट्रॉडक्टरी प्राईसवर ओला स्कूटर खरेदी करण्यास सांगितले. त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, ओला स्कूटरची पहिल्या दिवशीची विक्री संपूर्ण 2-व्हीलर इंडस्ट्रीच्या एकुण विक्रीपेक्षा सुद्धा जास्त आहे.

24 तासात केली होती 1 लाख बुकिंग

ओला स्कूटरची जेव्हा बुकिंग सुरू झाली होती, तेव्हा सुद्धा तिने विक्रम केला होता.
तेव्हा कंपनीला एका दिवसा 1 लाखापेक्षा जास्त ओला स्कूटरची बुकिंग मिळाली होती.
कंपनीने अवघ्या 499 रुपयात ओला स्कूटरची बुकिंग सुरू केली होती.
आता कंपनीने ओला स्कूटर खरेदी करण्याची विंडो सुद्धा त्या लोकांसाठी उघडली आहे ज्यांना अगोदरच यासाठी बुकिंग केली आहे.

ही आहे ओला स्कूटरची किंमत

कंपनीने ओला स्कूटरचे 2 मॉडल आणले आहेत.
यामध्ये Ola S1 ची एक्स-शोरूम प्राईस 99,999 रुपये आणि Ola S1 Pro ची प्राईस 1,29,999 रुपये आहे.
FAME-2 सबसिडी आणि राज्य सरकारच्या सबसिडीनंतर दिल्लीत Ola S1 ची किंमत 85,009 रुपये आणि गुजरातमध्ये 79,000 रुपये आहे.

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; संभाजीराजे म्हणाले – ‘आता तरी सरकराने…’

पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! SBI च्या ‘या’ सर्व्हिसद्वारे घर बसल्या मिळतील ‘या’ सर्व सुविधा; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ola Scooter | last day to purchase ola scooter bhavish aggarwal tweet company sale 4 scooter per second on first day tutk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update