ola देणार 10 हजार जणांना रोजगार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूमध्ये जगातील सर्वात मोठी ‘स्कूटर फॅक्टरी’ उभारण्यासाठी २ ,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे ओला कंपनीने सांगितले. कंपनीचे मुख्यालय बेंगळूरु येथे आहे. कारखाना सुरू करण्यासाठी तामिळनाडू सरकारबरोबर (एमओयू) करार केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या माध्यमातून कंपनीला भारत इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र बनवायचे आहे.

कारखान्यामध्ये १०,००० रोजगार मिळतील
ओला म्हणाले, “ जगातील सर्वात मोठी स्कूटर उत्पादन सुविधा असून याची सुरूवातीस २० लाख युनिट्सची वार्षिक क्षमता असून कारखाना पूर्ण झाल्यावर सुमारे १०,००० रोजगार मिळतील. येत्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज लॉन्च सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.

कारखाना जगभरात पुरवठा करेल
तामिळनाडू कारखाना केवळ भारतातच नव्हे तर युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि जगभरातील बाजारपेठेतही ग्राहकांना उत्पादने पुरवेल.
ओलाचे अध्यक्ष व गटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हणाले, “ही जगातील सर्वात प्रगत उत्पादन सुविधांपैकी एक असेल. हा कारखाना जागतिक स्तरावरील उत्पादनांची निर्मिती करण्याचे भारताचे कौशल्य आणि प्रतिभा दाखवेल.”