कचराकुंडीत सापडल्या जळालेल्या ५००, १०००च्या जुन्या नोटा, शहरात खळबळ – उलट,सुलट चर्चांना उधाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सावेडी येथील शुभम मंगल कार्यालयाजवळील कचरा कुंडीत मोठ्या प्रमाणात जुन्या ५००, १००० रुपयांच्या नोटा जाळून टाकलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून उलट,सुलट चर्चांना उधाण आले आहे.

सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी चलनातून बाद झालेल्या ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा कोणीतरी जाळून टाकल्या. त्यानंतर सावेडी नाका येथील शुभम मंगल कार्यालयाजवळ कचराकुंडीत टाकून दिल्या. जळालेल्या नोटा पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी कचराकुंडी परिसरात गर्दी केली होती. या नोटा नेमक्या कुठल्या राजकीय व्यक्तीच्या आहेत की व्यापाऱ्यांच्या आहेत, याचा उलगडा होऊ शकला नाही.

तब्बल साडेतीन वर्षानंतर चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस किंवा आयकर विभागाकडून पकडले जाऊ नये, यासाठी कोणीतरी या नोटा जाळून टाकून दिल्या असाव्यात, असे बोलले जात आहे.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या