‘या’ 3 कारणांमुळे ‘कोरोना’बाधितांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक ‘धोका’ !

लंडन : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्ये दिवसांगणिक बदल होत असल्याने अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. त्यातही कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढते आणि अशांना मृत्यूचा धोका असल्याची बाब एका अभ्यासातून समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मधुमेह, श्वासोच्छवास आणि फुफ्फुसांसंबंधित आजार आणि अन्य गंभीर आजार असण्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे.

‘या’ रुग्णांना सर्वाधिक धोका
बीएमजे नुसार 50 वर्षापेक्षा जास्त प्रौढ, पुरुष, स्थुलत्व, हृदयरोग, फुफ्फुस, मूत्रपिंड आदी संदर्भात आजार असलेल्या कोरोना बाधितांना मृत्यूचा धोका असतो. 43 हजारहून ज्सात रुग्णांचा अभ्यास आतापर्यंत याबाबत केलेल्या अभ्यासात ब्रिटनचे लिव्हरपूल विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांसह अन्य सर्वांनी इंग्लंडमधील रुग्णालयात भरती झालेल्या कोविड -19 रुग्णांच्या आकड्यांचे विश्लेषण केले आहे. अध्ययन प्रकाशित होईपर्यंत यामध्ये 43 हजाराहून जास्त रुग्णांचा सहभाग करण्यात आला आहे.

‘या’ सर्वांना सर्वाधिक त्रास
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी ते  19 एप्रिलदरम्यान इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडमधील 208 रुग्णालयात भरती झालेल्या  20133 रुग्णांच्या आकड्याचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासानुसार रुग्णालयात भरती झालेल्यांचे वय सर्वसाधारण 73 होते आणि महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. वयाबरोबरच ज्यांना हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आदींबाबत आजार असलेल्यांना अधिक त्रासाचा सामना करावा लागत होता.

भारतात ‘या’ वयाच्या नागरिकांना सर्वाधिक धोका
कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयानुसार सांगितले जात आहे की, मृत्यूच्या विश्लषणानुसार कोरोनामुळे जीव गमवाणाऱ्यांमध्ये 64 टक्के पुरुष आणि 36 टक्के महिला आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like