रिअल लाईफ ‘हम दिल दे चुके सनम’ ! पत्नीच्या पूर्वीच्या प्रियकरासाठी पती देणार ‘घटस्फोट’

भोपाळ : वृत्तसंस्था – 1999 साली हम दिल दे चुके सनम हा सिनेमा आला होता. यात अजय देवगन आपली पत्नी ऐश्वर्या रॉयला तिच्या पहिल्या प्रियकराला म्हणजेच सलामन खानला भेटवण्यासाठी घेऊन जात असतो. परंतु पत्नी पुन्हा परत येते. असंच एक खऱ्या आयुष्यातील प्रकरण समोर आलं आहे. भोपाळमधील ही घटना आहे. जिथे एक पती आपल्या पत्नीच्या आधीच्या प्रियकरासाठी तिला घटस्फोट देत आहे.

पत्नी के पुराने प्रेमी के लिए पति देगा तलाक, रियल लाइफ 'हम दिल दे चुके सनम'

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ कोर्टात हे प्रकरण समोर आलं आहे. एक पती आपली पत्नी खुश रहावी म्हणुन तिचं लग्न तिच्या आधीच्या प्रियकरासोबत लावून देणार आहे. त्यासाठी तो तिला घटस्फोट देत आहे.

पत्नी के पुराने प्रेमी के लिए पति देगा तलाक, रियल लाइफ 'हम दिल दे चुके सनम'

नेमकी घटना काय ?

सात वर्षांपूर्वी एक महिला फॅशन डिझायनर आणि एक सॉफ्टवेअर इंजिनियर लग्नबंधनात अडकले. दोघांना दोन मुलंही आहेत. लग्नानंतर सगळं काही ठिक होतं. परंतु एके दिवशी त्या महिलेला कळालं की, तिच्या प्रियकरानं अजूनही लग्न केलेलं नाही. यानंतर तिच्या मनात पुन्हा जुनं प्रेम उमलू लागलं. पती पत्नीत वादही होऊ लागलं.

सदर महिला आपल्या प्रेमीसाठी घर कुटुंब सगळं सोडायला तयार आहे. सध्या हे प्रकरण फॅमिली कोर्टात गेलं आहे. जिते काऊंसलिंगदरम्यान पतीनं सांगितलं की, पत्नी बॉयफ्रेंडला विसरायला तयारच नाही. त्याने तर तिला खुश ठेवण्यासाठी प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला आहे. पत्नी म्हणते की, तिला प्रियकरासोबतच रहायचं आहे.

पत्नी के पुराने प्रेमी के लिए पति देगा तलाक, रियल लाइफ 'हम दिल दे चुके सनम'

पत्नीचं ऐकल्यानंतर पतीनं कोर्टात सांगितलं की, “या सगळ्या खराब वातावरणाचा मुलांवर काही परिणाम होऊ नये यासाठी मला तिला घटस्फोट द्यायचा आहे. जेणेकरून ती आपल्या प्रियकरासोबतही राहू शकेल.”

पत्नी के पुराने प्रेमी के लिए पति देगा तलाक, रियल लाइफ 'हम दिल दे चुके सनम'

काऊंसलरचं म्हणणं आहे की, “सध्या घटस्फोटाची केस दाखल झाली आहे. ज्याप्रमाणे पती आपल्या पत्नीच्या आनंदासाठी त्याग करायला तयार आहे पत्नीही आपल्या प्रियकरासोबत राहण्यावर अडून आहे. असं वाटत आहे की, पुढील सुनावणीत त्यांचा घटस्फोट होईल.” पतीनं मुलांना त्याच्याकडे ठेवण्याची अट घातली आहे जी पत्नीलाही मान्य आहे.

Visit : Policenama.com