धक्कादायक ! दूर्धर आजाराला वैतागून वृद्धाची रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – आजारपणाला वैतागून एका वृद्धाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार खराळवाडी येथी समोर आला आहे. हा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे.

रुपचंद धोंडीराम सुंदेचा (वय ८५, रा. खराळवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे.

रुपचंद धोंडीराम सुंदेचा यांना दुर्धर आजार झाला. त्या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी मध्यरात्री अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ते १०० टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर या घटनेची माहिती मिळताच पिपंरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. परिसरात या घटनेने मध्यरात्री एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान हा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like