नाल्यात वाहून गेल्याने जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – आठवडाभरापासून पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. पावसामुळे मुंबई, पुण्यासह विविध भागात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. मंगा चिमण सिरसाठ (५५, रा. आच्छी) असे मृत्यू पावलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. ही घटना गुरुवार (४ जुलै) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मंगा सिरसाठ हे पहाटे शेताकडे निघाले होते. गावातून शेताकडे जाण्यासाठी वाटेत एक नाला लागतो. तो नाला ओलांडताना सिरसाठ यांचा तोल जावून ते नाल्यात पडले. पावसामुळे नाल्याचे पाणी वाढले होते. त्या पाण्यात ते बऱ्याच अंतरापर्यंत वाहून गेले. सिरसाठ यांना पोहता येत नसल्याने नाका तोंडात पाणी जावून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात