तहानलेल्या श्वासला ज्येष्ठानं हातांनी पाजवलं पाणी, व्हायरल Video नं जिंकली सगळयांची मनं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती तहानलेल्या कुत्र्याला आपल्या हातांनी पाणी देताना दिसत आहे. लोकांच्या काळजाला हात घालणारा असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक कुत्रा नळाजवळ उभा आहे आणि एक वयस्कर व्यक्ती त्याच्या हातांनी त्याला पाणी देत आहे. या व्हिडिओद्वारे सुशांत नंदा यांनी मानवतेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ सामायिक करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे – जर तुम्ही एखाद्या असहाय माणसासाठी किंवा प्राण्यासाठी काहीही केले नाही तर तुमचे जीवन निरर्थक आहे.

प्रत्येकजण हा व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती देत आहेत. यूजर्सने कमेंट करत म्हंटले कि, आज लोकांकडे पैसा, ताकद आहे, परंतु फारच थोड्या लोकांचे हृदय आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून अजूनही माणुसकी शिल्लक आहे, असे म्हणण्यात काहीही हरकत नाही. लोकांमध्ये अद्यापही प्राण्यांबद्दल प्रेम आहे.