CMO प्रशासन विसरलं ‘मंत्रिमंडळ विस्तार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना डिजीटल यंत्रणेचा वापर करून वाद ओढवून घेणाऱ्या फडणवीस सरकारने मात्र CMO ची वेबसाईट अपडेट केलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार होऊन अधिवेशनाची सुरु झाले तरीही मुख्यमंत्री कार्यालयाच्या वेबसाईटवर जुन्याच मंत्र्यांचे प्रोफाईल आहेत. सीएमओची वेबसाईट सांभाळणाऱ्या प्रशासनाला मंत्रिमंडळ विस्ताराचा विसर पडल्याचेच दिसत आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. भाजपच्या ८, शिवसेनेच्या २ आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका मंत्र्यांने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तरीही सीएमओच्या वेबसाईटवर या मंत्र्यांची नावे त्यांच्या खात्यासहित झळकत आहेत. या वेबसाईटवर अजूनही नवीन मंत्री आणि त्यांचे खाते याबाबतचा तपशील दिसून येत नाही. तर, ज्या मंत्र्यांना मंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आला आहे, त्यांचेही नाव अद्याप सीएमओच्या वेबसाईटवर झळकत आहे.

चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्व निर्माण झालं होतं.प्रकाश मेहतांसह, राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिश अत्राम या सहा विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला गेला आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप), संजय कुटे (भाजप), सुरेश खाडे (भाजप), अनिल बोंडे (भाजप), तानाजी सावंत (शिवसेना), अशोक उईके (भाजप) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

आरोग्याविषयक वृत्त

पावसाळ्यात किटाणूंपासून आजार होऊ नये म्हणून घ्या हि काळजी

ऑफिसाला जाणाऱ्यांनी पावसाळ्यात स्वतःची अशी काळजी घ्या

” उपवास ” हा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र या लोकांसाठी घातक

स्लीपर चप्पल पायांसाठी वेदनादायी

ही ” योगासन ” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण

मानसिक रोग होणार कि नाही हे कळणार आता “आवाजावरून “

सिने जगत

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक