Old Mumbai Pune Highway Accident | दुभाजक तोडून समोरुन आलेल्या कंटनेरला कारची धडक ! कारमधील चालकासह 5 जणांचा जागीच मृत्यु, मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Old Mumbai Pune Highway Accident) शिलाटणे गावाजवळ आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी भीषण अपघात झाला. जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर (Old Mumbai Pune Highway Accident) मुंबईकडून पुण्याकडे येणार्‍या भरधाव कारने दुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी समोरुन आलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील ३ महिला, चालकासह ५ जण जागीच ठार झाले आहे. अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

 

याबाबत महामार्ग पोलिसांनी (Highway Police) दिलेल्या माहितीनुसार, ही कार हरियाना पासिंगची असून अपघातात ठार झालेले सर्व जण मुंबईला राहणारे आहेत. मुंबईहून ही कार पुण्याकडे येत होती. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्याच्यामध्ये असलेला दुभाजक तोडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर कार आली. त्याचवेळी समोरुन आलेल्या कंटेनरखाली ही कार घुसली. कारमधील सर्व ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, पोलीस, स्थानिक ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरखाली अडकलेली कार व प्रवासी यांना बाहेर काढले. या अपघातामुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

 

Web Title :- Old Mumbai Pune Highway Accident | The car hit the container that came in front by breaking the divider! Five people, including the driver of the car, died on the spot, including three women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा