Old Pension Scheme | ‘धमक होती तर मग फडणवीसांनी पाच वर्षे झोपा काढल्या काय?’, जुन्या पेन्शन योजनेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यास नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची धमक फक्त भाजपमध्येच (BJP) आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस करत आहेत. शिक्षक मतदारसंघात निवडणुकीच्या (Teachers Constituency Election) प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याचे विधान केले असले तरी त्यांच्या कपटनितीची शिक्षकांना कल्पना आहे. जुन्ही पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ आहे, तर मग पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी झोपा काढल्या काय? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Maharashtra Pradesh Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (spokesperson Atul Londhe) यांनी केला आहे.

 

अतुल लोंढे पुढे म्हणाले, केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनेच (NDA Government) 2003 मध्ये जुनी पेन्शन योजना बंद करुन नॅशनल पेन्शन योजना National Pension Scheme (एनपीएस-NPS) लागू केली असताना फडणवीस धादांत खोटे बोलत आहेत. आणि त्याचे खापर काँग्रेस सरकारवर फोडत असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.

भाजपचे नेते आरएसएसच्या (RSS) शिकवणीनुसार धादांत खोटे बोलण्यात पटाईत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करणे सरकारला शक्य नसल्याचे स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी सांगितले होते.
मग आताच फडणवीस यांच्यात धमक कुठून आली.
नागपूरच्या अधिवेशनात किंवा मागील पाच वर्षे मुख्यमंत्री असताना ही धमक कोठे गेली होती? असेही अतुल लोंढे म्हणाले.

 

Web Title :- Old Pension Scheme | fadnavis asleep by now question by atul londhe in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

Advay Hire | शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले…

CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे