वृद्ध पेन्शनरची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील वृद्ध पेन्शनर भाऊसाहेब गिरवले (वय 70) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना घडली. कर्जबाजारीपणातून ही आत्महत्या केल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.

गिरवले यांनी राहत्या घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेतला. आज सकाळी त्यांचा मृतदेह परिसरातील रहिवाशांनी पहिला. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात कस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मयत गिरवले हे पेन्शनर आहेत. त्यांचा एक मुलगा पुण्यात नोकरी करतो. कर्जबाजारीपणातून गिरवले यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.