Old Pune-Mumbai Road | खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील जुन्या पुणे- मुंबई रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार ! रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Old Pune-Mumbai Road | पिंपरी चिंचवड महापालिका Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) हद्दीतून पुण्यामध्ये दाखल होताना जुन्या मुंबई- पुणे रस्त्यावरील खडकी (Khadki) येथील जागा संरक्षण विभागाने महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महापालिकेनेही तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली असून बोपोडी (Bopodi) येथील हॅरीस ब्रिजपासून (Harris Bridge) खडकी कॅन्टोंन्मेंट (Khadki Cantonment Board) हद्दीतील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी सुमारे ४० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. (Old Pune-Mumbai Road)

 

महापालिकेने २०१६ मध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील बोपोडी येथील हॅरीस ब्रिजपासून खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील रेंजहिल्स चौकापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या रस्त्याच्याकडेला बोपोडी येथे राहाणार्‍या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतू खडकी रेल्वे स्टेशनपासून (Khadki Railway Station) रेंजहिल्स चौकापर्यंतची रस्त्याच्या कडेला असलेली संरक्षण विभागाची जागा मिळत नसल्याने रस्ता रुंदीकरण रखडले होते. विशेष असे की खडकी रेल्वे स्टेशनमुळे रस्त्याच्या विरूद्ध दिशेच्या जागेशिवाय रुंदीकरणासाठी पर्याय नव्हता. दरम्यान, स्वारगेट – पिंपरी चिंचवड मेट्रो (Swargate-Pimpri Chinchwad Metro) मार्गही याच रस्त्यावरून जाणार असल्याने भूसंपादनाअभावी मेट्रोचेही काम रखडले होते. त्यांनाही संरक्षण विभागाच्या जागेची गरज होती. (Old Pune-Mumbai Road)

या दोन्ही प्रकल्पांसाठी १० एकर जागेची गरज असून तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या जागेच्या बदल्यात येरवडा येथील महापालिकेची तेवढीच जागा संरक्षण विभागाला देण्याची तयारी दर्शविली होती.
यावर मागील आठवड्यात संरक्षण विभागाने निर्णय घेत रस्ता रुंदी करण व मेट्रोसाठीही जागा देण्यास मान्यता दिल्याने रस्ता रुंदीकरणासोबतच मेट्रोच्या कामातील महत्वाचा अडथळा दूर झाला आहे.
महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दोनच दिवसांपुर्वी या जागेची पाहाणी केली.
२०१६ मध्ये रस्त्याच्या कामाची निविदा ज्या ठेकेदाराला मिळाली होती,
त्याने मागील पाच वर्षातील दरवाढीनुसार काम करणे शक्य असल्याचे कळविले.
त्यामुळे प्रशासनाने या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला असून ४० कोटी रुपयांचे एस्टीमेटही तयार केले आहे.

 

जुन्या पुणे- मुंबई रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी संरक्षण विभागाने जागा दिली आहे.
महापालिकेच्यावतीने लवकरात लवकर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येईल.

विक्रम कुमार, महापालिका आयुक्त व प्रशासक (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar)

 

 

Web Title :- Old Pune-Mumbai Road | Work on old Pune Mumbai road within Khadki Cantonment boundary will start immediately Tender process started for road widening work

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा