… तर 100, 10 आणि 5 रूपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत : RBI

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च-एप्रिलनंतर या नोटा चलनात नसणार आहेत. त्यामुळे या जुन्या नोटा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. निर्णयानुसार या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहितीरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दिली आहे.
बी. महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, १००, १० आणि ५ रुपयांच्या नवीन नोटा आधीपासूनच चलनात आल्या आहेत. त्यामुळे मार्च-एप्रिलपर्यंत १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाहेर पडतील. कारण या नोटा परत घेण्याची योजना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१९ मध्ये १०० रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. मात्र नोटाबंदीच्या वेळी ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही. तर सर्वप्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असं आरबीआयने म्हटलं आहे.

दहा रुपयांच्या नाण्यांविषयी अफवा
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार काही व्यापारी किंवा दुकानदार दहाचं नाणं घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयने ही बँकेसाठी अडचण आहे. म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये १० रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये असं म्हटलं आहे.