पुण्यात भरधाव वाहनाच्या धडकेत वृध्द महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वाहनाने धडक दिल्याने वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील रामवाडी जकात नाक्यासमोर घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागूबाई महादेव पंचमुख (७०, रा. सिध्दार्थनगर, नगर रस्ता) असे मृत्युमूखी पडलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पंचमुख या आठवडयापुर्वी नगर रोडने जात असताना रामवाडी जकात नाक्यासमोर त्यांना रस्ता क्रॉस करताना भरधाव वाहनाने धडक दिली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. उपचार चालु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस वाहन चालकाचा शोध घेत आहेत. अपघात झाल्यानंतर वाहन चालक अपघाताची खबर न देता पसार झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.