अभिनेता सुशांत सिंहची ‘एक्स’ गर्लफ्रेंड पुन्हा एकदा ‘प्रेमात’ ; ‘त्याने’ केले गुडघ्यावर बसून ‘प्रपोज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. अंकिताने स्वत: हे मान्य केलं आहे. ती पुन्हा कोणाला तरी डेट करत आहे. अंकिताने आपला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचे काही फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत. यातून तिने आपल्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे.

अंकिता आणि विक्की नेहमीच सोबत दिसत असतात. परंतु दोघांनी कधीच आपल्या नात्याबद्दल खुलून भाष्य केलं नाही. असे असताना आता मात्र अंकिताने विक्कीसोबतचे असे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातून हे कंफर्म झालं आहे की, दोघेही एकेमेकांना डेट करत आहेत. अंकिताने जे फोटो शेअर केले आहेत. त्यात विक्की तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका फोटोत त्यांनी एकमेकांचा हात पकडल्याचे दिसत आहे.

आणखी एका फोटोत विक्की, अंकिताच्या गालावर किस करतानाही दिसत आहे. फोटो शेअर करत अंकिताने लिहिलं आहे की, “मी या बद्दल विचार करेन.” दोघांचे फोटो पाहिले तर लक्षात येते की, दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.

टीव्ही जगतातून अंकिता लोखंडेने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. नुकतीच अंकिता कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात दिसली होती. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचं लाँगटाईन रिलेशन होतं. परंतु पुढे हे नातं जास्त दिवस टिकलं नाही. दोघांचंही ब्रेकअप झालं.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव