OLX किंवा तत्सम Web साईटवरून होऊ शकते फसवणूक, अशी काळीजी घ्या

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – या धकाधकीच्या जीवनात जर कुठल्या गोष्टीची कमतरता असेल तर ती म्हणजे ‘वेळ’ या वेळेवर मात करण्यासाठी आज लोक मोठ्या प्रमाणात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर पुढे गेलेत. या इंटरनेटच्या युगात वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी घरबसल्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी प्राधान्य देऊ लागले. यामुळे वेळ आणि श्रम दोन्हीही वाचू लागल्याने ऑनलाईन शॉपिंग साठी चे पर्याय वाढले आणि यातूनच अनेक वस्तू या घरबसल्या एक क्लिक ने मिळू लागल्या. परंतु OLX आणि इतर काही साईटवरून सध्या फसवणुकीचे प्रकार सऱ्हास होत आहेत.

OLX वर नव्या-जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री होत असून ऑनलाईन साइटवरून अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून सर्व नागरिकांना सावधानता बाळगून खरेदी-विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान पोलीसांनी नागरिकांना काही महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत.

https://twitter.com/Navimumpolice/status/1198903435451518976

फसवणुकीपासून कसे वाचाल-
– तुम्ही जर OLX वर मोटार सायकल किंवा कार विक्रीबाबत जाहिरात केली असेल तर तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते. कारण ठग तुम्हाला गाडीची टेस्ट ड्राईव्ह करण्याच्या अनुषंगाने मोकळ्या जागेत नेऊन वाहन पळवून नेऊ शकतो.

– फसवणूक करणारे व्यक्ती तुम्हाला फसवण्यासाठी तुमची वस्तू कुरिअर करतो असे सांगून एखाद्या गाडीचा फोटो काढून त्यात कुरिअर आहे असे सांगून तुम्हाला फसवू शकतो. तसेच तुम्हाला व्हाट्सअपवर खोटी पावती देखील पाठवून तुमची दिशाभूल करू शकतात.

– फसवणूक करणारा व्यक्ती OLX वर वस्तू खरेदी करण्यासाठी पेटीएम, ई-वॉलेट किंवा युपीआर सारख्या ई-वॉलेटने पेमेंट होत नाही असे सांगुन रिक्वेस्ट मनीची लिंक पाठवून यूपीआर पिन टाका म्हणजे तुमच्या खात्यात तुमचे पैसे येतील असे सांगतात. परंतु रिक्वेस्ट लिंक बरोबर जोडली गेल्याने आपल्या खात्यातील पैसे त्यांच्या खात्यात आपोआप वळवले जातात आणि आपली फसवणूक केली जाते.

– खरेदी-विक्री करताना नेहमी विश्वसनीय वेब साईटवरूनच करावी जेणेकरून फसवणुकीपासून वाचता येईल. नेहमी वेब साईटची पब्लिक रिव्हिव्ह तपासूनच खरेदी-विक्री केली पाहिजे. तसेच त्या वेबसाइटवर https:// असेल त्याच वेबसाईटला भेट देऊन कारभार करावा.

– OLX किंवा तत्सम वेबसाइटवरून व्यवहार करताना संबंधित व्यक्तीची माहिती काढूनच पैसे द्या किंवा घ्या.

– OLX वर खरेदी-विक्री करताना ई-वॉलेट किंवा युपीआर, पेटीएम सारख्या आणखी अनेक ई-वॉलेट वरून पे किंवा सेंड या ऑप्शन वर क्लिक करू नका.

– जर विक्रेत्याने साहित्य पाठवले असे सांगून त्या संबंधित स्लिप व्हाट्सअपला पाठविली तर त्या कुरिअर स्लिप ची पूर्णपणे खात्री करून घ्या आणि स्लिपवरील

फोन नंबर चुकीचा आहे ही नाही हे तपासून पहा.
– OLX किंवा तत्सम वेबसाइटवरून खरेदी-विक्री करताना व्हाट्सअपला पाठविलेले आयडी किंवा मॅसेज यावर विश्वास ठेऊन व्यवहार करू नका.

– सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नामांकित कंपनीच्या वस्तू या कधीही कमी किमतीत ऑनलाईन विकल्या जात नाहीत त्यामुळे कुणी जर अशा वस्तू स्वस्तात विकत असेल तर ती व्यक्ती आपली फसवणूक करत आहे हे लक्षात घ्यावे.

Visit : Policenama.com