… म्हणून ऑलिम्पिकपटू अन् महाराष्ट्राचा सुपूत्र दत्तू भोकनळ करतोय शेतात काम !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या क्रीडा स्पर्धा होत नसल्याने अनेक खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. या परिस्थितीत ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात काम करतोय. नौकानयनपटू दत्तू भोकनळने शनिवारी सोशल मीडियावर शेतात काम करत असल्याचे फोटो टाकले आहेत. दत्तू हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रोही इथला रहिवाशी आहे.

जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्य सुमारे 1 कोटी 26 लाख 31 हजार 866 इतकी झाली आहे. त्यापैली 73 लाख 67 हजार 593 रुग्ण बरे झाले आहेत तर, 5 लाख 62 हजार 921 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 लाख 22 हजार 674 इतका झाला असून त्यापैकी 5 लाख 16 हजार 308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22 हजार 152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता 2 लाख 38 हजार 461 इतकी झाली आहे. एकूण 1 लाख 32 हजार 625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविले आहेत. राज्यात एकूण 95647 ऍक्टिव्ह रुग्ण असून अजूनही अनेक भागात कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.

ऑलिम्पियनपटू दत्तू भोकनळ यानं लिहिलं की,
Yes I am a FarmerMan farmer
घामाचे थेंब पेरून मातीतून मोती मिळवुन देणारा एकमेव कारागीर म्हणजे शेतकरी …
काळ्या मातीत जन्म माझा काळ्या मातीशी नातं…
काळ्या आईची करनी तिला,लेकराची माया!
माय होईल हिरवी गान,हिरीताच गाया!
वरती आभाळाची हाये मला,बापावानी छाया!
#जय_जवान_जय_किसान!

दत्तूने दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई आणि ओशियानिक ऑलिम्पिक पात्रता फेरीत 7 मिनिटं 07.63 सेकंटाची वेळ नोंदवून रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेला तो एकमेव भारतीय नौकानयपटू असून 2018च्या आशियाई स्पर्धेत त्याने Men’s Quadruple sculls प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like