मलालाच्या ट्विट वरून ‘नेमबाज’ हिना सिद्धू चांगलीच ‘भडकली’, दिलं ‘हे’ सडेतोड उत्तर

चंदिगढ : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफजाईने काश्मीर संदर्भात एक ट्विट केले होते. त्यावर भारताची नेमबाज हिना सिद्धू चांगलीच भडकली. नेमबाज हिना सिद्धूने मलालाला एका रिट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.

मलालाने आधी स्वतः पाकिस्तानला जाऊन दाखवावे
नेमबाज सिद्धू म्हणाली की, मलालाने आधी स्वतः पाकिस्तानला जाऊन दाखवावे असे रिट्विट करताना तिने म्हटले आहे. तुझ्या मतानुसार आम्ही काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकला पाहिजे कारण की, तेथे शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळत नाहीयेत !

शिक्षणामुळेच जीव जाता-जाता वाचला
पुढे हिना ने याप्रसंगी मलालाला आठवण करून दिली की, पाकिस्तान मध्ये मलाला युसूफजाईचा शिक्षणामुळेच जीव जाता-जाता वाचला आहे. त्यानंतर मलालाने आपला देश सोडला आणि नंतर कधीच परत गेल्या नाहीत. त्यामुळे आधी आपण स्वतः पाकिस्तानला परत जाऊन दाखवावे असे हिनाने ट्विट मध्ये म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like