Olympics 2020 | टोकियोमध्ये भारताचे ‘हे’ 7 चॅम्पियन, जाणून घ्या त्यांच्या बाबत

टोकियो : वृत्तसंस्था – Olympics 2020 | भारताने टोकियो ऑलम्पिकमध्ये एक सुवर्ण पदकासह 7 पदक जिंकून या खेळांमध्ये आतापर्यंत सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. यापूर्वी भारताने 2012 च्या लंडन ऑलम्पिकमध्ये 6 पदके जिंकली होती, परंतु तेव्हा सुवर्ण पदक नव्हते. भारताने 13 वर्षानंतर सुवर्ण पदक मिळवले आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारे खेळाडूंची कामगिरी (Performance of medal winning athletes for India at the Tokyo Olympics 2020) आणि करियर (Career) वर एक नजर –

Bajrang Punia (PTI)

1. बजरंग पूनिया : कांस्य पदक / Bajrang Poonia: Bronze medal
बजरंगला सुवर्ण पदकाचा सर्वात मोठा दावेदार मानले जात होते. सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु, कांस्य पदक जिंकून त्याने देशाचे नाव उंचावले.

तो लहानपणापासून कुस्ती खेळत होता आणि अर्ध्या रात्री दोन वाजताच उठून आखाड्यात जात असे. 2008 मध्ये स्वता 34 किलो असताना तो 60 किलोच्या पहिलवानाला भिडला आणि त्याला चित केले.

Ravi Dahiya (PTI)

2. रवि दाहिया : रजत पदक / Ravi Dahiya: Silver Medal
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नाहरी गावात जन्मलेला रवीने पुरुषांच्या 57 किग्रॅ फ्रीस्टाईल कुस्तीत रजत पदक जिंकून आपली ताकद दाखवून दिली. रवि दहिया दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेतो, जिथून अगोदरच भारताला दोन ऑलम्पिक पदक विजेते – सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त मिळाले आहेत.

त्याचे वडील राकेश कुमार यांनी त्याला 12 वर्षाच्या वयात छत्रसाल स्टेडियममध्ये पाठवले होते. त्याचे वडील रोज आपल्या घरापासून 60 किमी दूर असलेल्या छत्रसाल स्टेडियमपर्यंत दूध आणि लोणी घेऊन जात असत. त्याने 2019 जागतिक चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकून ऑलम्पिकचे तिकिट पक्के केले आणि नंतर 2020 मध्ये दिल्लीत आशियाई चॅम्पियनशिप जिंकली आणि अलमाटीमध्ये यावर्षी किताब जिंकला.

 Mirabai Chanu (PTI)

3. मीराबाई चानू : रजत पदक / Mirabai Chanu: Silver Medal
मणिपुरच्या या खेळाडूने 24 जुलैला भारतासाठी आपल्या पदकावर नाव नोंदले. तिने 49 किग्रॅ वर्गात रजत पदक जिंकून वेटलिफ्टिंगमधील पदकाचा 21 वर्षाचा दुष्काळ संपवला. या 26 वर्षाच्या खेळाडूने एकुण 202 किग्रॅचा भार उचलून रियो ऑलम्पिक (2016) मध्ये आलेली निराशा दूर केली.

इम्फाळपासून जवळपास 20 किमी अंतरावरील नोंगपोक काकजिंग गावात राहणारी मीराबाई सहा भाऊ-बहिणींमध्ये सर्वात छोटी आहे. तिचे बालपण पर्वतावर लाकडे तोडणे आणि जवळच्या तलावावरून डब्ब्यातून पाणी आणण्यात गेले. तिला तिरंदाज बनायचे होते. परंतु मणिपुरची दिग्गज वेटलिफ्टर कुंजरानी देवीबाबत वाचल्यानंतर तिने या खेळात भाग घेण्याचे ठरवले.

PV Sindhu (PTI)

4. पी.व्ही. सिंधु : कांस्य पदक / P.V. Sindhu : Bronze medal
सिंधुला पहिल्यापासून पदकाची मजबूत दावेदार मानले जात होते. तिने कांस्य पदक जिंकून कुणालाही निराश केले नाही. या 26 वर्षाच्या खेळाडूने यापूर्वी 2016 रियो ऑलम्पिकमध्ये रजत पदक जिंकले होते, तर ऑलम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी देशाची पहिली महिला आणि एकुण दुसरी खेळाडू बनली आहे.

टोकियो खेळात तिच्या कामगिरीचा अंदाज यावरूनच येतो की, सेमीफायनलमध्ये ताय जु यिंग विरूद्ध दोन गेम गमावण्यापूर्वी तिने एकाही गेममध्ये पराभवाचा सामना केला नव्हता. हैद्राबादच्या शटलरने 2014 मध्ये जागतिक चॅम्पियनशिप, आशियाई खेळ, राष्ट्रमंडळ खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर अंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.

Hockey India (PTI)

5. पुरुष हॉकी टीम : कांस्य पदक / Men’s Hockey Team: Bronze Medal
भारतीय पुरुष हॉकी टीमने कांस्य पदक जिंकून या खेळात 41 वर्षाचा दुष्काळ संपवला. हे पदक सुवर्ण नव्हते, परंतु देशात हॉकीला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी महत्वाचे ठरले. ग्रुप टप्प्याच्या दुसर्‍या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 1-7 ने पराभूत झाल्यानंतर मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली टीमने शानदार कामगिरी केली.

सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून पराभूत झाल्यानंतर टीमने कांस्य पदक प्ले ऑफमध्ये जर्मनीला 5-4 ने मात दिली. संपूर्ण टूर्नामेंटच्या दरम्यान मनप्रीतच्या प्रेरणादायक नेतृत्वासह गोलकीपर पीआर श्रीजेशने शानदार कामगिरी केली.

Lovlina Borgohain (PTI)

6. लवलीना बोरगोहेन : कांस्य पदक / Lovlina Borgohain: Bronze medal
आसामची लवलीनाने आपल्या पहिल्या ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला.
ती विजेंदर सिंह आणि मेरीकोम नंतर बॉक्सींगमध्ये पदक जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू आहे.
23 वर्षाच्या लवलीनाचा खेळाचा प्रवास आसाममधील गोलाघाट जिल्ह्याच्या मुखिया गावातून सुरू झाला. तिला लहापणी ‘किक-बॉक्सर ’ बनायचे होते.

ऑलम्पिकच्या तयारीसाठी 52 दिवसांसाठी युरोप दौर्‍यावर जाण्यापूर्वी ती कोरोना व्हायरसने संक्रमित झाली,
परंतु तिने शानदार पदार्पण करत 69 किग्रॅ वर्गात चीनी तायपेची माजी जागतिक चॅम्पियन निएन-शिन चेनला मात दिली.

Neeraj Chopra (PTI)

7. नीरज चोपडा : सुवर्ण पदक / Neeraj Chopra: Gold Medal
भालाफेक अ‍ॅथलीट नीरज चोपडा ऑलम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक जिंकणारा केवळ दुसरा भारतीय आहे.
नीरजला तीन वर्षांपासून ऑलम्पिकमध्ये पदकाचा सर्वात मोठा दावेदार मानले जात होते
आणि शनिवारी त्याने 87.58 मीटरच्या थ्रोसह ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताला ऑलम्पिक पदक मिळवून दिले.

2016 जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर,
अंडर-20 वर्ल्ड रेकॉर्डसह ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
नीरज 2016 मध्येच भारतीय लष्करात ‘चार राजपूताना रायफल्स’ मध्ये सूभेदार पदावर नियुक्त झाला.

2018 राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळात सुवर्ण पदक मिळवले आहे.
त्याने 2017 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये प्रमुख स्थान मिळवले होते.

Web Title :- olympics 2020 | tokyo olympics 2020 india medal winners

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Unlock | अखेर पुण्यातील निर्बंध शिथिल ! वीकेंड लॉकडाऊनही रद्द, दुकाने दिवसभर तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु; मात्र अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा

PM Kisan | खुशखबर ! उद्या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा यादीतील तुमचं नाव

Pune Crime | सेवानिवृत्त सैनिकाच्या फ्लॅटमध्ये घरफोडी, बंदूक आणि 5 जिवंत काडतुसासह 7 लाखांचा ऐवज लंपास