ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, ‘ही’ आहे बिर्लांची पार्श्‍वभूमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कॉंग्रेससह एकूण १० पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणे अनपेक्षितपणे बिर्ला यांची निवड करून धक्का दिला होता. मात्र सभागृहात आज त्यांची बिनविरोध लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

विरोधी पक्षांचाही पाठींबा

१७ व्या लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर एनडीएची सत्ता पुन्हा स्थापित झाली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ सदस्य ओम बिर्ला यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पसंती दिली.

कोण आहेत बिर्ला ?

ओम बिर्ला हे कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडून आले आहेत. बिर्ला हे २००३ ते २०१३ या कालावधीत तीन वेळा राजस्थान विधानसभेचे सदस्य होते. राजस्थानचा सर्वात मोठा वैश्य चेहरा म्हणून ते ओळखले जातात. वसुंधरा राजे यांचे विरोधक असण्याचा लाभ त्यांना मिळाला.

ओम बिर्ला यांच्या बाबत थोडक्यात –
फक्त 2 वेळा खासदार असलेले ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर लोक हे तपासात आहेत की बिर्ला यांना मोदी सरकारने लोकसभेचे अध्यक्ष का बनवण्यात आले. तर काही लोक बिर्ला यांच्या कमी अनुभवावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिर्ला राजस्थान सरकारमध्ये संसदीय सचिव देखील होते. यावेळी त्यांनी अनेक चांगली कार्य पार पाडली. २०१४ च्या अनेक संसदीय समितीत देखील ते होते. याशिवाय त्यांची सर्वांना एकजूट करण्याची क्षमता देखील चांगली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंध उत्तम आहेत. ते ऊर्जावान आहेत. या सर्व कारणाने त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले.

राजकीय कारकिर्द –
ओम बिर्ला यांचा जन्म ४ डिसेंबर १९६२ ला झाला. २०१४ च्या १६ व्या लोकसभेत ते पहिल्यांदाच खासदार झाले. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीत देखील ते त्याच मतदार संघातून पुन्हा निवडूण आले. या आधी २००३, २००८ आणि २०१३ ला ते राजस्थानातील कोट्यातून विधायक होते. म्हणजेच ते एकूण तीन वेळा आमदार होते. तर दो वेळा खासदार आहेत, अशी ओम बिर्ला याची राजकीय कारकिर्द आहे.

अनेक समित्यांमध्ये सदस्य –
२०१४ साली पहिल्यांदा खासदार झाल्यावर त्यांना अनेक समित्यामध्ये जागा मिळाली. त्यांनी याचिका समिती, ऊर्जा संबंधित स्थायी समिती, सल्लागार समिती अशा समित्यांचे सदस्य बनवण्यात आले होते. १९९२ ते १९९५ हे राष्ट्रीय सहकारी संघ लिमिटेडचे उपाध्यक्ष देखील होते. कोटात सहकारी समितीत देखील त्यांना महत्व दिले जाते. त्याची पत्नी अमिता बिर्ला व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या वडीलांचे नाव श्रीकृष्ण बिर्ला आणि आईचे नाव शकुंतला देवी आहे. ओम बिर्ला यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत.

रोगींसाठी उपचार –
राजस्थान सरकारमध्ये ते संसदीय सचिव देखील होते, या दरम्यान त्या गंभीर रोगांनी ग्रसलेल्या लोकांच्या उपचारासाठी ५० लाख रुपयांची वित्तीय मदत केली होती. ऑगस्ट २००४ मध्ये आलेल्या पुरात त्यांनी काम केले आहे. ओम बिर्ला तेव्हा आधिक चर्चेत आले जेव्हा त्यांनी स्वतंत्र दिनी आजादी के स्वर असा कार्यक्रम आयोजित करुन १५ हजार पेक्षा आधिक अधिकाऱ्यांना सन्मानित केले. हा समारोह कोटा आणि बुंदी मध्ये आयोजित करण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय 

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

जाणून घ्या. कुष्ठरोगा बाबतचे समज-गैरसमज 

 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय