ॐ उच्चाराने होतात आरोग्याचे ‘हे’ खास लाभ

पोलीसनामा ऑनलाइन – काही गोष्टींकडे आपण धार्मिक दृष्टीकोनातून पाहतो. मात्र, अनेकदा या गोष्टी आपल्या आरोग्याशी अथवा अन्य बाबींशी संबंधीत असतात. मुळात त्यांचा वापर याच कारणांसाठी केला जातो. परंतु, त्यास धर्माचे नाव दिलेले असते. जेणेकरून पूर्ण निष्टेने त्याचे पालन व्हावे. असाच काहीसा प्रकार ॐ या मंत्रात आहे. ॐ उच्चारणे हे धर्माशी संबंधित असले तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. भारतातीलच डॉ. आर. एस. शर्मा यांनी ॐच्या उच्चारणावर अनेक प्रकारचे संशोधन केले आहे. रोज केवळ पाच मिनिटे ॐ उच्चारण केल्याने मानसिक आणि शारीरिक लाभ दिसून येतात, असा दावा डॉ. शर्मा यांनी केला आहे.

ॐ उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोझिशनमध्ये बसावे. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यावा. नंतर ॐ उच्चारण करत हळूहळू श्वास सोडावा. या काळात पूर्ण शरीरात कंपन होईल याचा प्रयत्न करावा. जर ॐ उच्चारण करताना कान बंद करता आले आणखी फायदा होऊ शकतो. या उच्चारणाचे अनेक शारीरीक फायदे आहेत. ॐ उच्चारण केल्याने गळ्यामध्ये कंपने निर्माण होतात. यामुळे थायरॉइडच्या समस्येपासून बचाव होतो. तसेच अँग्झायटी, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या दूर होतात. ॐ उच्चारण केल्याने मानसिक शांतता मिळते. ताण, तणाव दूर होतो.

ॐ उच्चारण केल्याने शरीरामध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो. रक्तामध्ये ऑक्सिजन वाढतो. फुप्फुस, रक्तदाब आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते. यामुळे हृदय सुदृढ राहते. पोटामध्ये कंपने निर्माण होतात. यामुळे पचन चांगले होते. शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. रक्तप्रवाह चांगला होतोे. तसेच ऊर्जा वाढते. थकवा दूर होतो. ताजेतवाने वाटते. झोपण्याअगोदर ॐ उच्चारण केल्याने झोप न येण्याची समस्या दूर होते. तसेच फुप्फुसाची क्षमता वाढते. शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. तसेच ॐ उच्चारण केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते. यामुळे मणक्याची हाडे मजबूत होतात. मेंदूमध्ये कंपन झाल्याने एकाग्रता वाढून मेंदू तल्लख होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/