‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’, देशभरात आज गुरुपौर्णिमा साजरी

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll”

आज सर्वत्र गुरु पौर्णिमेचा साजरी होताना पाहायला मिळत आहे.आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी देशभरात गुरू पौर्णिमा साजरी करण्यात येते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा शुभ दिवस आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज लाखो भाविक शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त शेगावलाही मोठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भारतात अनेक विद्वान गुरु होऊन गेले. मात्र, चार वेदांचा सखोल अभ्यास करुन जगाला वेदाचे महत्व सांगणारे पहिले गुरू म्हणून महर्षि वेद व्यास यांना मान मिळाला आहे.

आपल्या शिक्षकांबद्दल आणि गुरुंबद्दल आदर ठेऊन गुरुचरणी नतमस्तक होण्यात येत आहे. आषाढी पौर्णिमेला गुरू महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता, त्यामुळेच या दिवशी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.महर्षि व्यास यांच्यावरूनच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हंटले जाते.

प्रत्येकाच्या जीवनात आणि यशाच्या शिखरावर शिक्षक आणि गुरु यांचे अप्रतिम अन्यन्यसाधारण महत्व असते. त्यामुळेच व्यास पौर्णिमेला गुरु पौर्णिमा श्रद्धाभाव आणि गुरुप्रती आदर ठेवून साजरी होते. प्रत्येक धर्मामध्ये गुरुला मोठे स्थान देण्यात आले. गुरूशिवाय जीवनच व्यर्थ आहे. हिंदू पुराणकथांनुसार क्षत्रिय महाभारतील धनुर्धारी योद्धा अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला गुरू मानले होते. या महायुद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती. या भगवदगितेला अनेकांनी गुरु ग्रंथ मानला आहे. त्यामुळेच भारतात गुरू पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे.

“गुरू महंत वधुनी राज्य करणे।
त्या परिस लौकिकी
भिक्षा आचरणे।
उपा तरी सुखाकारणे।
ते रूधीर भोग जाणावे।।”

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून गुरुजनांना , प्रथम वंदन करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजपर्यंत.त्याच पार्श्वभूमीवर आज शिर्डीतील साई मंदिरात आणि शेगाव येथील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.