Om Pratishthan | मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ओम प्रतिष्ठानचा माहितीपट प्रदर्शित

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ओम प्रतिष्ठानच्या (Om Pratishthan) वतीने ‘विद्यादान योजनेंतर्गत’ अनेक मुलींना आर्थिक मदत करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील एका विद्यार्थीनीला ‘विद्यादान योजनेंतर्गत’ 25 हजार रुपयांचा धनादेश नुकताच देण्यात आला. ओम प्रतिष्ठान (Om Pratishthan) संचलित विद्यांगण शाळेमध्ये शनिवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणी कुलकर्णी (Kalyani Kulkarni) यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला.

यावेळी संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारा लघु माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या सारिका इंगोले, मनजीत सिंग बिलक, पराग, विद्यादान योजनेच्या अध्यक्षा सोनल पाटील, सेक्रेटरी विद्या महाजन, संस्थापक अध्यक्षा वनिता सावंत, माहितीपटाचे लेखक दिग्दर्शक हरिष तरुण, एडिटर समृद्धी कुचिक आणि विद्यार्थीनीचे पालक अनिल दळवी उपस्थित होते.

यावेळी पराग यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, समाजातील असंख्य मुलींना केवळ अर्थिकच नाही तर
मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे, ओम प्रतिष्ठान (Om Pratishthan) यासाठी अविरतपणे झगडत असून
अशा संस्थांना मदतीचा हातभार लावण्यासाठी लोकांनी पुढे यावे, मुलींना शिकावण्यासारखे मोठे कार्य नाही,
असे मत व्यक्त केले. आजही अनेक मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो ही नवी गोष्ट नाही,
अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

Web Title :-  Om Pratishthan | A documentary on Om Pratishthan, which strives for girls’ education, is released