हास्यास्पद ! ‘ती मला रोज केळं फेकून मारते’ म्हणत पोलिसांत तक्रार दाखल

लिंकन : वृत्तसंस्था – केळाचा शस्त्र म्हणून वापर केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? निश्चितच नसेल ऐकले. परंतु असा एक प्रकार समोर आला आहे ज्यात एका महिलेने केळाचा वापर सूड घेण्यासाठी शस्त्र म्हणून केला आहे. नेब्रास्कामधील ओमाहा शहरातील ही घटना आहे. एका महिलेने झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी केळाचा वापर केला आहे. ओमाहा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ओमाहा शहरातील बेन्सन टॉवरमध्ये राहणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीचं 23 वर्षीय महिलेशी गाडी पार्किंगच्या जागेवरून जोरदार भांडण झालं. आता हे भांडण पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे. हे प्रकरण पोलिसांकडे आल्यानंतर त्यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. परंतु यानंतर मात्र त्या महिलेने व्यक्तीचा सूड घ्यायचे ठरवले. त्या महिलेने त्या व्यक्तिला केळे मारण्यास सुरुवात केली. सदर व्यक्ती ऑफिसला जाताना ही महिला रोज बाल्कनीतून त्याला केळे फेकून मारू लागली. तब्बल एक आठवडा हा प्रकार सुरू होता. रोज अंगावर पडणाऱ्या केळ्यांमुळे सदर व्यक्तीने वैतागून पोलिसात तक्रार केली.

पोलिसांकडे हे प्रकरण आल्यानंतर सुरुवातीला तिने मात्र एकदाच केळ फेकून मारल्याचे कबूल केले. नंतर  महिलेने सांगितले, “त्याने माझ्या मुलीला कुरूप म्हटल्याने मी त्याला केळे फेकून मारले.” असे स्पष्टीकरण तिने दिले. केळे फेकून मारणे हा गुन्हा नसल्याने पोलिसांनी तिला सोडून दिले. परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी संपलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like