‘हरी निवास’ मधून ‘शिफ्ट’ होतील उमर अब्दुला, घराजवळच राहणार ‘नजरबंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना कलम ३७० रद्द केल्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले. यांनतर आता १६३ दिवसांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाजवळील एका घरात हलविण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर यांना सध्या हरि निवास येथे ठेवण्यात आले असून त्यांची स्थलांतर करण्याची शक्यता आहे. कारण केंद्रसरकारचे मंत्रिमंडळ जम्मू-काश्मीर घाटीला भेट देण्यासाठी येत असल्याने त्यांची व्यवस्था हरी निवास येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमर त्यांची व्यवस्था त्यांच्या सरकारी निवास्थानाजवळ करण्यात येणार आहे. उमर यांचे वडील फारूक अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उमर यांच्यासमवेत अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता 5 ऑगस्टपासून नजर कैदेत आहेत. यापैकी फारूक हे एकमेव राजकारणी आहे जे 17 सप्टेंबरपासून पीएसएमध्ये बंद आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात जवळपास चाळीस मंत्री सहभागी होतील. या शिष्टमंडळात रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. हा कार्यसंघ 5 ऑगस्टनंतर येथून सुरु झालेल्या विकास कामांची माहिती घेणार आहे. 18 ते 20 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय आणि राज्यमंत्री सहभागी होणार आहेत. 18 जानेवारी रोजी अर्जुनराम मेघवाल परममंडल, डॉ जितेंद्रसिंग जम्मू, अश्विनी चौबे सांबा येथे कार्यक्रम करतील.

19 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रियासीमध्ये कर्यक्रम घेतील. महेंद्र नाथ पांडे जम्मू, अर्जुन राम मेघवाल कठुआ येथे राहणार आहेत. व्ही मुरलीधरन कठुआ आणि अनुरागसिंग ठाकूर जम्मूमध्येही राहतील. डॉ जितेंद्रसिंग उधमपूर, पीयूष गोयल जम्मू आणि अश्विनी चौबे सांबा येथे राहतील. प्रताप सारंगी कठुआ, आरके सिंह डोडा, देवश्री चौधरी जम्मूमध्ये राहतील. दरम्यान, हा कार्यक्रम शासनस्तरावर आयोजित केला जाईल, असे भाजप प्रदेश सरचिटणीस अशोक कौल यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते आणि कार्यकर्ते मंत्र्यांच्या कार्यक्रमात पोहोचतील आणि त्यांना यशस्वी करण्यात त्यांची भूमिका बजावतील.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like