चिंताजनक ! Corona लस घेतल्यानंतरही उमरगा ठाण्यातील 9 पोलिसांना पुन्हा कोरोना

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उमरगा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 10 दिवसात उमरगा पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाचा सामना करावा लागत आहे. त्यामळे लसीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

उमरगा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचा-यांची रॅपिड चाचणी केली असता त्यात सहाय्यक पोलिस कर्मचारी आणि 8 पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. यातील बहुतांश जणांनी कोविडची पहिली लस घेतली आहे. दुसरी लस घेण्याचा कालावधी जवळ आला आहे. सुरुवातीला एका पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर टप्प्याटप्याने 8 जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान लस घेतल्यानंतर अ‍ॅन्टीबॉडी तयार होण्यासाठी कालावधी लागतो.

दरम्यानच्या काळात संसर्ग झाला तरी त्या रूग्णाला धोका होत नसल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर यांनी सांगितले. दरमयान उमरगा तालुक्यात कोरोनाचे आता पर्यंत 2 हजार 400 पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा पूर्ण झाला आहे. मंध्यतरी संसर्ग कमी झाला होता. मात्र नवीन वर्षात जानेवारीत हळूहळू संसर्ग सुरू झाला. फेब्रुवारी, मार्च महिन्यातही संख्या वाढत गेली. गेल्या तीन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी (दि. 11) रॅपीडच्या अहवालात 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.