नामिबियात अ‍ॅडॉल्फ हिटलरचा मोठा विजय

पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे नाव घेतली की आठवते ती नाझी विचारधारा. आज हे नाव पुढे येण्यामागे कारणही तसेच आहे. दक्षिण ऑफ्रिकेमधील नामिबिया देशात एका आमदारकीच्या निवडणुकीत अ‍ॅडॉल्फ हिटलर मोठ्या मताधिक्याने जिंकला आहे. त्यामुळे या उमेदवाराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. ही बाबा लक्षात येताच या उमेदवाराने आधीच स्पष्ट केले की, त्याचे जगावर राज्य करण्याचे मनसुबे मुळीच नाहीत.

नामिबियाच्या सत्ताधारी स्वापो पक्षाचे ५४ वर्षांचे हिटलर हे सदस्य आहेत. त्यांना ओम्पुंजा विधानसभा मतदारसंघातून जवळपास ८५ टक्के मते मिळाली आहेत. या मोठ्या विजयानंतर जर्मनीच्या एका वृत्तपत्राने त्यांची मुलाखत घेतली. ‘बिल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार खऱ्य़ा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नाझी विचारधारेशी या नव्या आमदारांचा नावा व्यतिरिक्त काहीही संबंध नाही.
नामिबियाच्या हिटलरना लहानपणी हे नाव सामान्य वाटत होते. त्यांच्या वडिलांनी जर्मनीच्या अ‍ॅडॉल्फ हिटलरवरून हे नाव ठेवले होते. हिटलरला त्यांच्या नावाचा नेमका अर्थ काय हे समजत नव्हते.

विजय मिळाल्यानंतर अ‍ॅडॉल्फ हिटलर म्हणाले, जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मला समजले की, या नावाची व्यक्ती खूप कुप्रसिद्ध आहे आणि तो जगावर राज्य करू इच्छित होता. मला या साऱ्या गोष्टींशी काहीच देणे-घेणे नाही. केवळ नावात साम्य आहे. मला जगाला ताब्यात घ्यायचे नाही, तर केवळ ओम्पुंजा विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याची इच्छा आहे.

माझे नाव माझ्या साऱ्य़ा अधिकृत कागदपत्रांमध्ये नोंद आहे. त्यामुळे ते बदलण्याचा कोणताही विचार नाही. १८८४ ते १९१५ दरम्यान, नामिबिया जर्मनीचा हिस्सा होते. तेव्हा या देशाला जर्मन दक्षिण पश्चिमी आफ्रिका म्हटले जात होते.