अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी ; सलमान ‘या’ आजाराने ग्रस्त !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खान हे बॉलिवूडमधील असे एक नाव आहेत ज्या नावानेच सिनेमे हिट होतात. सध्या सलमान खान आपला आगामी सिनेमा भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्या सोबत कॅटरीना कैफ आणि दिशा पाटनी देखील झळकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानचा सिनेमा भारत सोशलवर चर्चेत आहे. सध्या सलमान खानशी निगडीत एक बातमी समोर आली आहे. ही बातमी सलमानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ठरु शकते.

तुम्हाला सांगू इच्छितो की, सलमान खान एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. खूपच कमी लोक असे आहेत जे या आजाराविषयी जाणतात. सलमान खानला ट्राईजेमिनल न्यूरॉल्जिया नावाचा आजार आहे. हा एक न्यरोपॅथिक डिसऑर्डर आहे. रिपोर्ट्सनुसार, या आजारात पेशंटला चेहऱ्याचा एखादा भाग जसे की, जबडा, कान आणि डोकंही खूप जास्त दुखतं. सलमान खान तब्बल 9 ते 10 वर्षांपासून या आजाराशी झुंज देत आहे. यासाठी तो नेहमीच अमेरिकेला जातो. अमेरिकेतच तो या आजारासाठी उपचार घेत आहे.

Salman

सलमानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सलमान खानचा भारत हा सिनेमा 5 जून रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय सलमान लवकरच दबंग 3 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.