OMG फोटो व्हायरल ! दीपिकाने रणबीरला हग करत दिला ‘गुडबाय किस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे ब्रेकअप झाले असून आता तर दीपिकाने रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधली आहे, तरी ती रणबीरची आजही चांगली मैत्रीण आहे. आजही ते कोणत्याही कार्यक्रमात भेटल्यावर त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासारखी असते. सध्या तर रणबीर आणि आलिय भट यांच्याही नात्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. अशातच आता रणबीर कपूर आणि दीपिका यांचा एक किस करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. काल रात्री दीपिका व रणबीर यांनी एका अवार्ड नाईटला हजेरी लावली होती. यानंतर त्यांचे हे फोटो समोर आले आणि क्षणातच सर्वत्र व्हायरल झाले.

 

 

काल झालेल्या अवाॅर्ड नाईटमध्ये दोघांनीही स्टेजवर एकमेकांसोबत धम्माल मस्ती केली. ‘लडकी आंख मारे’ या पती रणवीरच्याच गाण्यावर दीपिका व रणबीरने ताल धरला. हा इव्हेंट संपल्यानंतर रणबीर आणि दीपिका बाहेर आल्यानंतर हग आणि किस करताना दिसून आले. त्यांचे हे क्षण लगेचच कॅमेऱ्यात कैद झाले. क्षणार्धात त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. नेटकऱ्यांनी त्यांच्या या फोटोवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींना दीपिका व रणबीरचे हे ‘स्वीट जेस्चर’ आवडले तर काहींनी ते पाहून नाक मुरडले. काहींनीतर रणबीरला दीपिका सोडून आलियावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. पण जगापासून बेफिकीर रणबीर व दीपिकाला यामुळे फार फरक पडला नाही आणि कदाचित पडणारही नाही. खरे तर रणवीरलाही यावर आक्षेप नसावा.

 

 

एकेकाळी दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पुढे त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ते पुन्हा एकत्र येतील असे सर्वांना वाटत होते. परंतु दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. दुसरीकडे रणबीरनेही कॅटरिनाला सोडून आलियामध्ये गुंतला. आता रणबीर-दीपिका दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. पण दोघांमध्ये आजही मैत्रीचे नाते आहे. नुकतेच रणबीर व दीपिका एका जाहिरातीत झळकले आहेत.