OMG ! मॅच फिक्सिंगनंतर देखील पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटर खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक धक्कादायक निर्णय घेतला असून स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी असलेल्या खेळाडूवरील बंदी त्यांनी उठवली असून त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तानचा खेळाडू शरजिल खान हा 2017 मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर या प्रकरणात कारवाई करत पाच वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर सोमवारी त्याच्यावरील हि बंदी उठवण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेड बोर्डाने घेतला. 2017 मध्ये पाकिस्तान सुपर लीगमधील एका सामन्यात त्याने स्पॉट फिक्सिंग केले होते.

त्यानंतर त्याच्यावर कारवाई करत त्याला 2022 पर्यंत खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र फक्त 2 वर्षानंतर त्याच्यावरील हि बंदी उठवत त्याला खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. या प्रकरणात शरजिल खान याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांची या प्रकरणी भेट घेतली होती. त्यानंतर त्याने या प्रकरणी बिनशर्त माफी मागितल्याने त्याच्यावरील हि बंदी उठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शरजिल खान याने पाकिस्तानकडून 25 एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळला आहे. त्यामुळे आता हि बंदी उठवल्यानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त