OMG ! ‘सिक्स पॅक’ बनवता-बनवता झालं असं काही की 18 वर्षाच्या तरूणाचं ’प्रेग्नंसी बंप’ प्रमाणे आलं पोट, जाणून घ्या प्रकरण

लंडन : OMG | इंग्लंडमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले जेव्हा एका फिट आणि निरोगी तरूणाचे अचानक पोट दिसू लागले. ही व्यक्ती जेव्हा पोटदुखीची समस्या घेऊन डॉक्टरकडे गेली तेव्हा खरे (OMG) कारण समोर आले.

काईल स्मिथसाठी हे हैराण करणारे प्रकरण होते जेव्हा अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनमध्ये हे समोर आले की, त्याच्या पोटात 15 सेंटीमीटर बाय 15 सेंमीचा ट्यूमर आहे. हा ट्यूमर कॅन्सरचा होता.

युकेची वेबसाइट मिररनुसार, 18 वर्षाच्या स्मिथला इव्हिंग सार्कोमा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. हा साधारणपणे मुले आणि तरूणांमध्ये होतो. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर आता स्मिथची किमोथेरपी केली जात आहे.

सिक्स पॅक बनवता-बनवता कॅन्सरने गाठले

स्मिथ एक बास्केटबॉल खेळाडू आहे आणि इंग्लंडच्या मर्सरीसाईडच्या लेदरलँडशी संबंधीत आहे.
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याने म्हटले की, चाचणीनंतर मला हसू येत होते, माझा विश्वास बसत नव्हता की मला कॅन्सर आहे.

स्मिथने म्हटले की, सिक्स पॅकची बॉडी बनवता-बनवता आता असे वाटू लागले आहे की, मी नऊ महिन्याचा गरोदर आहे.
जर मी याकडे दुर्लक्ष केले असते तर कदाचित माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नसता.