हॉलिवूड अभिनेता इद्रीस एल्बा आणि गेम ऑफ थ्रोन्स प्रसिध्द क्रिस्टोफर हिवजूला ‘कोरोना’ची ‘लागण’

पोलीसनामा ऑनलाइन – हॉलिवूड स्टार टॉम हॅक्स आणि ओल्गा कुरीलेंको यांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच माहिती समोर आली होती की, गेम ऑफ थ्रोन्स सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेता क्रिस्तोफर हिज्जू (Kristofer Hivju) हा देखील कोरोनाचा शिकार झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा चकित करणारी बातमी समोर आली आहे. या कोरोनाग्रस्तांमध्ये आणखी एका स्टारचं नाव समाविष्ट झालं आहे. गेम ऑफ थ्रोन्समधील क्रिस्तोफरचा सह अभिनेता इद्रीस एल्बा यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, इद्रीस एल्बानं सांगितलं की, त्याच्यामध्ये कोरोनाचं एकही लक्षण नव्हतं परंतु तरीही त्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव आली आहे. क्रिस्तोफर हिज्जूनही त्याच्या पॉझिटीव रिपोर्टबद्दलची माहिती सोशल मीडियावरून शेअर केली होती. क्रिस्तोफरनं त्याच्या इंस्टावरून चाहत्यांना याबाबत सांगितलं होतं. फॅमिलीसोबतचा फोटो शेअर करत क्रिस्तोफरनं एक लांबलचक पोस्ट लिहली आहे.
गेम ऑफ थ्रोन्समधील दोन्ही अभिनेत्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं चाहते चिंतीत दिसत आहेत. त्यांचे चाहते आता त्यांच्या लवकर ठिक होण्याची कामना करत आहेत. अनेकांनी म्हटलं आहे की, जगातील या महामारीपासून लवकरच सर्वांची मुक्तता व्हावी.