अरे देवा ! युरोपातील सर्वात मोठी Tax चोरी, 5 वर्षात 4.3 लाख कोटी लुटले

न्युयॉर्क : वृत्तसंस्था – युरोपच्या इतिहासात सर्वात मोठी करचोरी पकडण्यात आली असून याचे मुख्य सुत्रधार दोघेच असले तरीही यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासारखे हजारो जण सहभागी आहेत. मात्र, त्यांना याची जराशीही कल्पना न होऊ देता युरोपच्या वेगवेगळ्या देशांमधून तब्बल 60 अब्ज डॉलरची करचोरी करण्यात आली आहे.

न्यूयॉर्क मधील एका इंग्रजी वृत्तपत्राने याचे वृत्त दिले असून दोन इन्व्हेस्टमेंट बँकर ब्रिटन मार्टिन शील्ड्स आणि किवी पॉल मोरा यांनी युरोपला लुबाडले आहे. हे दोघेजण मेरील लिंच बँकेत कर्यरत होते. यावेळी एक मिटींगदरमयान त्यांची लंडनमध्ये भेट झाली. त्यांनी दोघांनी मिळून एक योजना तयार केली. ज्याचे नाव होते कम एक्स ट्रेंडिंग म्हणजेच विद ऑर विदाऊट. याद्वारे गुंतवणूकदारांना दुप्पट करापासून वाचवणे हे प्रमुख उद्दीष्ट होते. गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नावर कमीतकमी कर लागावा आणि पैसे वाचावेत अशी ही योजना होती.

हे दोघे डिव्हिडेंट टॅक्स पेमेंटवर डबल रिफंड घेत होते. हा सर्व उद्योग योग्य वेळ आणि कायद्यातील पळवाटा शोधून चालला होता. कराचे पैसे वाचत असल्याने ही योजना कमी कालावधीत जास्त प्रमाणात पसरली. या कर चोरीचे सर्वाधिक नुकसान जर्मनीला झाले असून या देशाला 30 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यानंतर फ्रान्सला 17 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या देशांमध्ये स्पेन, इटली, बेल्जिअम, नॉर्वे पोलंड या देशांचा समावेश आहे. हा  घोटाळा 2006 ते 2011 या काळात झाला आहे. यापूर्वी दुबईत राहणारा ब्रिटीश नागरिक संजय शहा याने डेन्मार्कला 2 अब्ज डॉलरचे नुकसान केले होते. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा –