काय सांगता ! होय, ‘हे’ संगीत ऐकून मुली आणि महिला संबंध ठेवण्यास फारच ‘उत्तेजित’ होतात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्ही कधी असं ऐकलं आहे का, की एखादं म्युझिक किंवा गाणं ऐकल्यानंतर महिला आणि मुली संबंध बनवायला सुरुवात करतात किंवा त्या संबंध ठेवण्यासाठी उत्तेजित होतात. वाचताना थोडं विचित्र वाटेल परंतु याबात आपण आज काही माहिती घेणार आहोत जी महत्त्वाची आहे.

हे गाणं ऐकून कमी वयात मुलं-मुली ठेवतात संबंध

रिसर्चमध्ये असा खुलासा करण्यात आला आहे की, रॅप म्युझिक ऐकणारी मुलं, मुली कमी वयातच संबंध ठेवायला सुरुवात करतात. रिसर्चमध्ये केलेल्या खुलाशानुसार इतर प्रकारच्या म्युझिक किंवा गाण्यांच्या तुलनेत रॅप म्युझिकमध्ये स्पष्टपणे लैंगिंक संदेश दिलेला असतो. संशोधकांच्या मते, माध्यमिक शाळेतील जी मुलं-मुली 3 तासांहून अधिक वेळ रोज रॅप ऐकतात ते इयत्ता नववीतच संबंध ठेवायला लागले.

‘या’ कारणामुळं रॅप ऐकून मुलं-मुली संबंध ठेवतात

एक्सपर्ट्स सांगतात की, “जेव्हा किशोर वयातच कोणी रॅप साँगमध्ये सेक्सच्या गोष्टी ऐकतं तेव्हा तो किंवा ती आपल्या आसपासच्या मित्रांना विचारतो की, लोक असंच वागतात किंवा नाही.” संशोधकांनी पालकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी आपल्या मुलांसोबत खुलून गप्पा माराव्यात. खास करून रॅप साँग आणि त्यातील शब्दांबद्दल आवश्य बातचित करायला हवी. लैंगिक वर्तन आणि डेटींगबद्दलही त्यांना समजावून सांगायला हवं.